खाजगी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्या सोडवणार.

खाजगी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्या सोडवणार.

महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेस उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस, शिक्षण मंत्री श्री. दिपकजी केसरकर, ग्रामविकास मंत्री श्री.गिरीशजी महाजन यांचे आश्वासन.

नागपूर (१९) – राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांच्या विविध समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या वतीने व भाजप आमदार श्री.रणधीरभाऊ सावरकर साहेब, अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरणरवा सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, शालेय शिक्षण मंत्री मा.श्री.दिपकजी केसरकर साहेब, ग्रामविकासमंत्री मा.श्री.गिरीशजी महाजन साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेद्रजी फडणवीस साहेब यांनी व्यस्त कार्यक्रमातून महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेस वेळ देऊन समस्या जाणून घेऊन चर्चा केली व सदर प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. तसेच शालेय शिक्षण मंत्री श्री.दिपकजी केसरकर साहेब यांनी निवेदनात नमूद समस्यांबाबत मुद्देनिहाय केली. यावेळी लवकरच शालेय शिक्षण विभागाची बैठक लावुन शक्य असेल ते मंजूर करण्याचे आश्वासन दिले. तसेच ग्रामविकास मंत्री मा.श्री.गिरीशजी महाजन साहेब यांनी निवेदन स्वीकारुन चर्चा करतांना खाजगी प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा परिषद स्तरावरील अधिका-यांना निर्देश देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी नागपूर अधिवेशनात महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी यांनी आमदार श्री.रणधीरभाऊ सावरकर, आमदार श्री.किरणराव सरनाईक, आमदार श्री.सत्यजीतदादा तांबे, आमदार श्री.सुधाकर अडबाले, आमदार श्री.राम शिंदे, श्री.भरत गोगावले, आमदार श्री.संतोष बांगर, आमदार श्री.अभिमन्यु पवार, आमदार श्री.निरंजनदादा डावखरे, आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे आदींच्या भेटी घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शिक्षक संघटनेने विद्यार्थ्यांना मोफत शुज व ड्रेस द्यावे, शालेय शिक्षणात सामान्य ज्ञान विषय समाविष्ट करावा. शाळा स्तरावर वाचणालय सुरू करावे. यासह शिक्षकांच्या मार्च पुर्वी ७ व्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते मिळावे, अंशतः अनुदानित शाळांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाढीव टप्पा अनुदान द्यावे, जावक रजिस्टर उपलब्ध नसल्यास ११ पैकी ३ मुद्दे ग्राह्य धरावे, सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अकोला जिल्हातील जावक रजिस्टर उपलब्ध नसणे प्रकरणी चौकशी करावी आदी मागण्या मांडण्यात आल्या.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री.मनिष गावंडे उपाध्यक्ष श्री.अल्केश खेंडकर, सहसचिव श्री.अविनाश मते, सहसचिव श्री.नरेंद्र चिमणकर सहसचिव श्री.गजानन सवडतकर, बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्री. गिरीश मखमले उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news