डॅडी देशमुख फिल्म फेस्टिवलचे नाव जगभरात पोहोचले — माजी आमदार गजानन दाळू गुरुजी

डॅडी देशमुख फिल्म फेस्टिवलचे नाव जगभरात पोहोचले – माजी आमदार गजानन दाळू गुरुजी

अकोला – मागील गत 6 वर्षांपासून स्व. डॅडी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यात आयोजित करित असलेल्या फिल्म फेस्टिवल मध्ये यावर्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय 2500 च्या वर शॉर्ट फिल्म आल्या ही अकोलेकरांसाठी खूप अभिमानास्पद बाब आहे. या फिल्म फेस्टिवलमुळे डॅडी देशमुख यांचे नाव जगभरामध्ये पोहोचले. असे मत माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांनी व्यक्त केले. लघु चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करत असताना ते बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी उपमहापौर निखिलेश जी दिवेकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार प्रा. तुकाराम भाऊ बिडकर फिल्म निर्माते संजय शर्मा , राजेश देशमुख, प्रा.संजय खडकार. प्रशांत देशमुख. सौ. राजश्री देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला डॅडी देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व दिप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन निलेश देवकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सदाशिव शेळके यांनी केले. यावेळी 20 उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म प्रेक्षकांना दाखवण्यात आल्यात. हा फिल्म फेस्टिवल दोन दिवस चालणार असून बुधवार 27 डिसेंबर रोजी या महोत्सवाचा समारोपाला होईल
याप्रसंगी आमदार रणधीर भाऊ सावरकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असतील तर प्रमुख अतिथी म्हणून अभिनेते संदीप कुलकर्णी. महाभारत मालिकेत बलरामांची भूमिका करणारे सुप्रसिद्ध अभिनेते सागरजी साळुंके .माजी आमदार दाळू गुरुजी. प्रसिद्ध लेखक रमेशजी इंगळे. प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी सिने अभिनेत्री अलका कुबल व श्री समीरजी आठल्ये यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून अकोल्यातील बालकलाकार स्वराज सोसे तथा बालगायीका कु. श्रुती भांडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. स्थानिक प्रमिलाताई हॉल येथे दुपारी 4 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात 10 उत्कृष्ट फिल्म दाखवण्यात येणार आहेत. त्यातील उत्कृष्ट चित्रपटांना पाहुण्यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल. या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असून जास्तीत जास्त संख्येने प्रेक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news