वर्‍हाडी भाषा कानाला व मनाला खुप भावली-अलका कुबल

कुटुंबवत्सल व सुशिल व्यक्तीमत्वास जीवनगौरव पुरस्कार प्रदान झाल्याचा मनस्वी आनंद-आमदार रणधीर सावरकर

वर्‍हाडी भाषा कानाला व मनाला खुप भावली-अलका कुबल

समृद्ध लघुचित्रपट महोत्सव आंतरराष्ट्रीय पातळीची उंची लवकरच गाठेल-अलका कुबल

=======================
अकोला : स्व डँडी देशमुख स्मृती लघुचिञपट महोत्सव समितीच्या वतीने दोन दिवशीय लघुचित्रपट महोत्सवाचा पुरस्कार वितरण समारोह स्थानिक प्रमिलाताई ओक सभागृह अकोला येथे संपन्न झाला.याप्रसंगी कुटुंबवत्सल, सुशिल दाम्पत्य व व्यक्तीमत्वास या वर्षीचा डॅडी देशमुख जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचा आज मनस्वी आनंद होत असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
प्रसिध्द अभिनेत्री अलका कुबल यांनी पुरस्कारास उत्तर देतांना विदर्भातील वर्‍हाडी भाषा व या मातीतील माणसं मनाला व कानाला खुप भावतात तर प्रेक्षकांनी आयुष्यभर माझ्या अभिनयावर प्रेम केलं याची मी आयुष्यभर ऋणी असल्याचे मनोगत व्यक्त केले.प्रसंगी विचारपीठावर सर्वश्री सिनेदिग्दर्शक समीरजी आठल्ये,प्रा तुकाराम बिडकर, माजी आमदार गजानन दाळु गुरुजी,मराठी चित्रपट निशानी डावा अंगठा चे कथाकार रमेश इंगळे उत्रादकर,महाभारतातील बलराम सागरजी साळुंखे,चित्रपट अभिनेता संदिप कुळकर्णी,निलिमा भोसले,माजी सभापती जयंत मसने,डॉ संजय खडक्कार, प्रशांत देशमुख, प्रा सदाशिव शेळके, डॉ राजेश देशमुख, चित्रपट दिग्दर्शक राधाताई बिडकर,पंकज देशमुख,राजश्री देशमुख, कुणाल देशमुख,सिनेदिग्दर्शक प्रा निलेश जळमकार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा तुकाराम बिडकरांनी स्व डॅडी देशमुख जयंतीनिमित्त आयोजित सहाव्या लघुचित्रपट महोत्सवाच्या आयोजनाची भुमिका विषद करून ७५० भारतीय व १९४० आंतरराष्ट्रीय स्तरावरुन आलेल्या लघुचित्रपट प्रवेशिका प्राप्त झाल्याची माहीती दिली.यावेळी माजी आमदार गजानन दाळु,सिनेदिग्दर्शक समिर आठल्ये,रमेश इंगळे,सागर साळुंखे,अभिनेते संदिप कुळकर्णी,निलेश जळमकार आदी मान्यवरांनी स्व डॅडी देशमुखांच्या कार्यावर प्रकाश टाकुन सदर महोत्सव आयोजनाबाबत आनंद व्यक्त केला.
सदर कार्यक्रमात बालवयात भरीव कामगीरी करणारे बालकलाकार स्वराज सोसे ( बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा फेम ) व श्रृती भांडे ( स्टार प्रवाह वरील सुपरस्टार छोटे वस्ताद उपविजेती गायीका ) यांना मान्यवरांचे हस्ते सन्मानीत करण्यात आले.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये व सिनेदिग्दर्शक समीर आठल्ये यांनी आयुष्यभर उत्कृष्ट कला प्रदर्शन करुन मराठी चित्रपट सृष्टीत आपली वेगळी छाप निर्माण करणाऱ्या दाम्पत्यास “स्व डँडी देशमुख जीवन गौरव पुरस्काराने” आयोजन समितीकडुन सन्मानीत करण्यात आले.
त्यानंतर विविध भाषेतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरुन प्राप्त उत्कृष्ट लघुचित्रपटांमधुन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय 20 निवडक लघुचित्रपट प्रदर्शीत करण्यात आले.सदर चित्रपटांचे परिक्षण सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री व दिग्दर्शीका वैशाली केंदळे, सिनेदिग्दर्शक संजय शर्मा,शाहीद कबीर,निलेश जळमकार, डॉ राजेश देशमुख यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी स्पर्धेत पात्र ठरलेल्या भारतीय भाषेतील अनुक्रमे प्रथम ऑटम फ्लाॅवर्स,द्वितीय ब्लॅकहोल,तृतीय राजकुमारी-द प्रिन्सेस,तसेच विदेशातील अझेह (Azheh),बेस्टडाॅक्युमेंटरी ब्लु क्रॅब (Blue Carab),बेस्ट अँनीमेशन साॅलेन ( Swollen) यक लघुचित्रपटांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन समितीकडुन गौरविण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी डाॅ नारायणराव बिरकड, प्राचार्य शत्रुघ्न बिरकड,डाॅ किसन मेहेरे,प्रा अनुराग मिश्रा,विलास इंगळे,राजेश आमले,प्रा श्रीराम पालकर, डॉ प्रभाकर मोहे,प्रा अशोक भराड अनिल मालगे, संजय तायडे,प्रा अशोक रहाटे,प्रा दिलीप अप्तुरकर, गजानन ताडे,प्रा अपर्णा खुमकर, प्रा शारदा उमाळे,प्रा प्रफुल देशमुख, निलेश देवकर,जगतजीवन पल्हाडे,प्रा माधव जऊळकार,प्रा कैलास देवबाले,राजदत्त मानकर,प्रा अनिता खंडारे,प्रा शारदा बावनेर,आदींसह आयोजन समिती सदस्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजन समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमाचे बहारदार संचलन सुप्रसिद्ध निवेदक तथा कलावंत किशोर बळी यांनी तर आभारप्रदर्शन प्रा श्रीराम पालकर व प्रा सदाशिव शेळके यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news