गोवंश तस्करी/तसेच महीला सुरक्षा सार्वजनिक मालमत्ता सुरक्षेला विशेष प्राधान्य.. पोलीस अधीक्षकांचे सर्व ठाणेदारांना निर्देश

गोवंश तस्करी/तसेच महीला सुरक्षा सार्वजनिक मालमत्ता सुरक्षेला विशेष प्राधान्य.. पोलीस अधीक्षकांचे सर्व ठाणेदारांना निर्देश

आज दिनांक ०५/०१/२०२४ रोजी, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हयातील पोलीस स्टेशन तसेच शाखा यांच्या कामकाजाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी १०.३० वा पोलीस अधीक्षक कार्यालय विजय हॉल येथे आढावा बैलकी दरम्यान पुर्ण जिल्हयाचा गुन्हे विषयक तसेच तुलनात्मक आढावा घेण्यात आला.

त्यामध्ये व्हीजीबल पोलीसींग, नाईट गस्त दरम्यान क्यु आर कोड स्कॅगिंग, सराईत गुन्हेगारावर एम.पी.डी.ए.. मोक्का, कायदया अंर्तगत योग्य प्रतिबंधक कार्यवाही करणे बाबत सुचना देण्यात आल्या, तसेच अवैह्मप्रवासी वाहतुक, फॅन्सी नंबर प्लेट, विना हेल्मेट, ट्रिपल सिट, वाहन चालविणारे वाहनचालका विरुदद्य प्रभावी कार्यवाही करण्याबाबत तसेच शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालय परिसरातील तंबाखूजन्य पदार्थावर विक्री करणारे विरूदध कारवाही करण्याबाबत सुचना देण्यात आल्या,
त्यादरम्यान २०२३ मध्ये उत्कृष्ट तपास, गुन्हे उकल, मुद्देमाल हस्तगत, क्लिष्ट तपास करणारे, डॉरमन फाईल मधील आरोपी अटक, एमपीडीए कायदया ची उत्कृष्ट अंमलबजावणी करणारे, एकुण ७२ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रशस्तीपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने पातुर येथील चोरीचे घटनेतील ८०लाखाची चोरी उघड करणारे तसेच पोलीस स्टेशन पिंजर घटनेतील हरवलेल्या मुलाचा व त्याचा खुन झाल्याचा गुन्हा उघड करणारे अधिकारी व पोलीस अंमलदार यांचा या सत्कारामध्ये विशेष समावेश होता. जिल्हयात कायदा व सुव्यस्था अबाधित राहण्याकरिता तसेच गुन्हे नियंत्रण करण्याकरिता विशेष मोहिमेचे आयोजन करण्याबाबत सुचना देण्यात आल्या. सदर आढावा बैठकीकरिता सर्व विभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच ठाणेदार तसेच सर्व शाखा प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news