मातृशक्तीच्या साक्षीने एक लाख वेळा रामरक्षा पठन ॲड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचा उपक्रम

मातृशक्तीच्या साक्षीने एक लाख वेळा रामरक्षा पठन ॲड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचा उपक्रम

अकोला – तीन हजारांवर मातृशक्तीच्या प्रमुख उपस्थितीत आणि चारशे शाळकरी विद्यार्थींनीच्या लयबध्द सादरीकरणातून एक लाख वेळा रामरक्षा पठणाचा भव्य कार्यक्रम २२ जानेवारी रोजी सकाळी ठिक १० वा. बिर्ला राम मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. एकीकडे अयोध्येत राम मंदिर उदघाटनाचा सोहळ्याचे थेट प्रसारण बिर्ला राम मंदिरात सुरु असेल तर दूसरीकडे अकोल्यात राम मंदिरात रामरक्षा पठनाचा भव्यदिव्य सोहळा सुरु असेल, अशी माहिती ॲड.धनश्री देव सेवा स्मृती प्रकल्पाचे प्रमुख निलेश देव यांनी येथे राम मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अकोल्यातील या रामरक्षा पठनाच्या सामुहिक सोहळ्याचे लाईव्ह प्रसारण माध्यमातून नेटवर्कच्या यु ट्युब, फेसबुक आणि टिव्हीवर देखील करण्यात येणार आहे.
या रामरक्षा कार्यक्रमासाठी शहरातील विविध भजनी मंडळांबरोबर, शाळांनी, मातृशक्तीने हजारोंच्या संख्येत नाव नोंदविले आहेत. मातृशक्तीच्या नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती निलेश देव यांनी दिली. या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या मातृशक्तीच्या गाड्यांची विविध ठिकाणी सुयोग्य पार्किंग, चपलांचे स्टँड, शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय, महिलांसाठीचे स्वच्छता गृह, भारतीय बैठक तसेच खुर्चीवर बसण्याची स्वतंत्र व्यवस्था आणि मंडप तसेच सहभागी प्रत्येकाला ‘राम प्रसादाचे’ वितरण करण्याचे सुयोग्य नियोजन असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या सोहळ्यापुर्वी निलेश देव मित्र मंडळ शहरातील सर्व धार्मिक स्थळांना १४ जानेवारी रोजी ध्वज वाटप करणार आहे. अयोध्येत २२ जानेवारी रोजी राममंदिर उदघाटनाचा ऐतिहासिक सोहळा होणार आहे. त्यामुळे आपआपल्या परिसरातील सर्व मोठ्या मंदिरांवर रोषणाई करत, भगव्या पताका लावत, अयोध्येतील राममंदिर उदघाटन सोहळ्यात आपला प्रत्यक्ष सहभाग प्रत्येकाने नोंदविणे आवश्यक आहे. संपुर्ण देशात रामभक्तांमध्ये उत्साह आहे. तसाच उत्साह अकोल्यात दिसून येत असून हा सार्वजनिक उत्सव आहे.
या उत्सवात प्रत्येक मंदिरात २१ जानेवारी आणि २२ जानेवारी रोजी भव्य दिव्यांची आरास करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. दिवाळीत जसे आपण दिव्यांची आरास घरांवर करत आलो अगदी तशीच आरास प्रत्येकाने घराघरात आणि विशेषतः मंदिरात करायची आहे. शेगाव येथे गजानन महाराज मंदिरात राम मंदिर आहे. त्यामुळे प्रत्येकाने अकोल्यात संत गजानन महाराज मंदिरात देखील दिव्यांची आरास करण्याचे आवाहन निलेश देव यांनी केले. घरातील दारात तुळशी जवळ दोन दिवे २१ आणि २२ जानेवारीला लावायचे आहे. तेव्हा सर्वांनी मंदिरात लखलखाट करण्यासाठी पुढाकार घ्यायचा आहे.
रामरक्षा पठन सोहळ्यासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून प्रत्येकजण स्वतः या कार्यात झोकून देत तन, मन, धनाने सहभागी आहे. ज्यांना या सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी आपल्या नावाची नोंद करत आपला सहभाग सुनिश्चित करावा. असे आवाहन निलेश देव मित्र मंडळाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news