आज पासून अकोल्या शहरात हेल्मेट सक्तीचे बिना हेल्मेट आढळल्यास लायसन रद्द करण्याचा प्रस्ताव आर.टी.ओ.कडे पाठविल्या जाईल ; पो.नि.किनगे यांचे आवाहन
अकोल्यात पुन्हा आज पासून हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे.अकोला वाहतूक पोलिसांनी थेट आता अकोल्यातील सर्व शासकिय कार्यालय सह सामान्य नागरिक यांना आवाहन केले असून कार्यालयात येतांना कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्तीचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे ऑफिसमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता आज दिनांक 16 जानेवारी पासून हेल्मेट सक्ती करण्यात आली असून सर्व नागरिक मोटारसायकल चालकानांही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे अशी माहिती आज दिनांक 16 जानेवारी रोजी अकोला शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक किनगे यांनी दिली आहे.