महावितरण कंपनीच्या तारांची चोरी करणारी टोळी गजाआड

महावितरण कंपनीच्या तारांची चोरी करणारी टोळी गजाआड

तब्बल 6 आरोपी अटक, 02 दुचाकीसह 128000/- रु.चा मुददेमाल जप्त करुन 07 गुन्हयाची उकल करण्यात दहिहांडा पोलिसांना यश दिनांक-11/12/2023 रोजी महावितरण कंपनीची केळीवेळी फिडर मध्ये 14 इलेक्ट्रिक पोलवरची सुमारे 280 किलो अॅल्युमिनिअम ची तार चोरी गेली असल्याबाबत महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यांनी तक्रार नोंदविल्यावरुन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल झाला. त्यांनतर लगेचच दिनांक-15/12/2023 रोजी चोहोटटा बाजार येथुन 120 किलो अॅल्युमिनियम तार चोरी गेल्याबाबत दुसरा गुन्हा नोंद करण्यात आला, लगातार महावितरणच्या तारचोरीचे दोन गुन्हे दाखल झाल्याने पोलिस अधिक्षक .अकोला, अप्पर पोलिस अधिक्षक . अकोला, यांनी सदरचे गुन्हे तात्काळ उघड करणेबाबत निर्देश दिल्याने उपविभागिय पोलिस अधिकारी अकोट अनमोल मित्तल यांचे मार्गदर्शनात पोलिस स्टेशन दहिहांडा चे ठाणेदार सपोनि योगेश वाघमारे, पोउपनि अरुण मुंढे, यांनी एक तपास पथक नेमुण अश्या प्रकारच्या यापुर्वी झालेल्या गुन्हयाचा सखोल अभ्यास करुन त्याबाबत गोपनिय यंत्रणा यांचे मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित इसम नामे-1) अमोल दिनकर बधे वय-22 वर्षे 2) चेतन सुभाष मेहेंगे क्य-23 वर्षे, ३) रोशन दादाराव रामचौरे वय-21 वर्षे 4) राहुल संजय मेहेंगे वय-21 वर्षे 5) नागेश राजु सुलताने वय 19 वर्षे 5 महिने 6) विकास गजानन रामचौरे वय-21 वर्षे सर्व रा. नखेगाव ता. अकोट जि. अकोला यांना ताब्यात घेतले असता सदर संशयित आरोपितांनी सदर लगातार झालेले दोन गुन्हे केल्याचे कबुल केले. त्यावरुन सदर संशयित आरोपितांना अटक करुन मा. न्यायालयासमक्ष हजर करुन त्यांचा पोलिस कोठडी रिमांड मंजुर

करुन घेउन त्यांचेकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्यांनी पो. स्टे दहिहांडा हददीमध्ये यापुर्वी दाखल झालेले चार गुन्हे व पो. स्टे उरळ हददीत एक गुन्हा केला असल्याची कबुली दिली.

 

गुन्हयातील आरोपितांकडुन त्यांनी गुन्हे करतेवेळी वापरलेल्या दोन मोटारसायकली किंमती -65000/- रुपये आणि त्यांनी संगणमताने चोरलेली तार विकुन मिळविलेली रक्कम – 63000/- रुपये असे एकुण-128000/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करुन सदर आरोपितांकडुन एकुण 7 गुन्हयांची उकल केली आहे. तसेच सदर सहा अटक आरोपितांना मा. अतिरिक्त सत्र न्यायालय अकोट यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली.

 

तसेच सदर गुन्हातील पाहिजे असलेले दोन आरोपी नामे-1) अर्जुन रविंद्र मुंडाले 2) योगेश रामराव मुंडाले दोन्ही रा. नखेगाव यांनी पो.स्टे उरळ हददीत पोलिस वाहनावर झालेल्या गोळीबारामध्ये यापुर्वी अटक आहेत. पुढील तपास दहिहांडा पोलिस करित आहेत.

 

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक श्री. बच्चनसिंह . अप्पर पोलिस अधिक्षक

.अभय डोंगरे , सहा. पोलिस अधिक्षक . अनमोल मित्तल , यांचे मार्गदर्शनात दहिहांडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सपोनि योगेश वाघमारे, पोउपनि अरुण मुंढे, स.फौ. अरुण घोरमडे, पोहेकों-सुदेश यादव, पोहेकॉ कमोद लांडगे, पोहेकों-अनिल भांडे, पोहेकों-नंदकिशोर चोपडे, पोहेकॉ सुरेश ढोरे, पोहेकों विनोद साळवे, पोहेकॉ राजेश राठोड, नापोकॉ-विजयसिंह चव्हाण, पोकों- रामेश्वर भगत, पोकॉ-मनिष वाकोडे, पोकॉ योगेश करनकार, पोकों-राहुल खंडवाय तसेच चालक नामे- सफी-महाजन, पोहेकों- सुधीर कोरडे, पोकों- सतिश राठोड, पोकों- हेमंत दासरवार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news