आजपासून मनपा आयुक्त विरोधात बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन करणार निर्दशने

आजपासून मनपा आयुक्त विरोधात बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन करणार निर्दशने

जिल्हाधिकारी कार्यालय येथे करणार आंदोलन

अकोला :- मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी ह्या ज्या संविधान मुळे आयुक्त पदावर आहे त्याच संविधानाचा आयुक्तांना पडला विसर. आपल्या पदाचा दुरुपयोग करत मनपातील एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांने आयुक्त महानगरपालिका यांच्यावर जंपीग पदोन्नती घेतलेल्या अधिका-र्यावर कार्यवाही न केल्याने गुन्हा दाखल केल्यामुळे आयुक्त यांनी आकसापोटी अतिक्रमण विभागातील कुली या पदावर असलेल्या सुनील इंगळे यास तडकाफडकी निलंबित केले होते.

या विरोधात बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन द्वारे आज दि.23 जानेवारी 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन दिली आहे. सविस्तर माहिती घेतली असता प्रताड़ित शिक्षक व कर्मचाऱ्यांना मनपा आयुक्तांनी बडतर्फ केले होते. त्या कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन राष्ट्रिय अध्यक्ष यांनी दि .13 आक्टोंबर, 28 नोव्हेंबर तसेच फेडरेशनचे जिल्हा सचिव सुनिल इंगळे यांनी 4 डिसेंबर रोजी आयुक्तांना जंपीग पदोन्नती घेतलेल्या अधिकारी व प्रताड़ित शिक्षक सह इतर कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा करिता पत्र दिले होते. त्या पत्रावर मनपा प्रशासनाने कार्यवाही न केल्याने नागपूर येथे हिवाळी अधिवेशन मध्ये धरणे आंदोलन निर्दशने करण्यात आली होती. या प्रश्नावर विरोधी पक्षनेते मा.विजय वडेट्टीवार यांनी सरकारचे लक्ष वेधले होते.तसेच विधान परिषदेचे आमदार किरण सरनाईक यांनीही विधान परिषद मध्ये हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सुतोवाच केले होते.तसेच जंपीग पदोन्नती घेतलेल्या प्रकरणाची सविस्तर माहिती साठी प्रधान सचिव यांना पत्र देऊन प्रकरणाची माहिती मागितली आहे.याबाबत चे पत्र विभागीय आयुक्त अमरावती कार्यालय येथून जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवलेले आहे. तसेच राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही फेडरेशन चे पत्र नगर विकास 2 कडे दिले असुन याप्रकरणी अहवाल मागितला असल्याची माहिती प्राप्त सूत्रानुसार माहिती पडले आहे. तसेच राज्यांचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही झालेल्या भ्रष्टाचार वर माहिती मागितली आहे. यासर्व बाबिचा धसका घेत आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांनी सुनील इंगळे यांचा रजेचा अर्ज मंजुर असताना सुद्धा त्यांना तडकाफडकी निलंबित केले . अधिक माहिती घेतली असता तिन पत्र दिल्यावर रजेचा अर्ज देण्याची आवश्यकता नसल्याचे कळते दुसरे म्हणजे विभाग प्रमुख यांनी सतत गैरहजर असल्याचा अहवाल न देता मनपा प्रशासनाने गैरहजर असल्याचा आरोप केला आहे. आणी वर्तणूक 6 दोन 1 मध्ये उलंघन केल्याच्या आरोप लावत निलंबन केले आहे.परंतु सुनील इंगळे यांच्या नागपूर येथे केलेल्या आंदोलनास स्पष्ट परवानगी असल्याने, रजा मंजुरअसल्यावरही वरिल आरोप सिध्द होत नसताना मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांनी जंपीग पदोन्नती प्रकरणात भ्रष्टाचाराला समर्थन देत न्याय मागणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच कार्यवाही करने म्हणजे पदाचा दुरुपयोग केल्यामुळे ज्या संविधाना नुसार आयुक्त यापदावर विराजमान झाले त्याच संविधान ला पायदळी तुडवित भ्रष्टाचार करणाऱ्यांना समर्थन देणाऱ्या आयुक्तां विरोधात बहुजन फेडरेशन द्वारे आंदोलन करण्यात येणार आहे. सुनील इंगळे यांना विना अटी कामावर रुजू करुन घेण्यासाठी दि.23 जानेवारी 2024 पासून धरने आंदोलन व निर्दशने करण्यात येणार आहे. तसेच यामध्ये शरद टाले , नितिन नागलकर यांच्यावर बडतर्फ ची कार्यवाही केल्याने याचा धसका घेत मृत्यू झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मृत्युला आयुक्त कविता व्दिवेदी जबाबदार असल्याने मनपा आयुक्तावर सदोष मन्युष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्राद्वारे देण्यात आली आहे. तसेच प्रताड़ित शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे जिपिएफ,ग्रजुटी,व पेन्शन त्वरित देण्यात यावे व प्रताड़ित शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना खोट्या आरोपामध्ये षडयंत्र रचणारे पास्को अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या सहकार खात्याचे ऑडिटर व्हि.आर.तायडे याला मदत करणारे प्र.म.बनचरे व तत्कालीन जिल्हा उपनिबंधक यांची चौकशी करून बडतर्फ करण्यासाठी बहुजन फेडरेशन चे राष्ट्रिय अध्यक्ष राजकुमार जवादे, राज्याधक्ष शेषराव रोकडे,सह फेडरेशनचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन उग्र निर्दशने व आंदोलन करणार आहेत आता जिल्हाधिकारी हे प्रकरण कशा प्रकारे हाताळतात याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news