ट्रक व दुचाकी मध्ये अपगात एक जागेवर ठार

ट्रक व दुचाकी मध्ये अपगात एक जागेवर ठार

वाडेगाव:- स्थानिक पोलीस चौकी अंतर्गत वाडेगाव चान्नी फाटा दरम्यान असलेल्या एका हॉटेल जवळ सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान समोरा समोर धडक झाल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला असल्यासाची माहीती मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाडेगाव चे नितीन देविदास बोराडे वय २८ हे दुचाकी क्रमांक एम एच ३०आर ५०७४ घरी जात असताना विरुध्द दिशेने येणाऱ्या ट्रॅक क्रमांक आर जे ०९ जी डी ५६१७ या वाहनाने
जबर धडक दिल्याने दुचाकी चा चुराडा झाला आहे.त्यामुळे दुचाकीवर असलेल्या नितीन बोराडे या युवकांचा जागेवर मृत्यू झाला. प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.याबाबत सहायक पोलिस निरीक्षक पंकज कांबळे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचून पंचनामा करण्यात आला.वृत्त लिहेपर्यत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news