मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर

मराठा समाजासाठीच्या आरक्षण विधेयकाला विधानसभेत एकमताने मंजुरी मिळाली आहे. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १०-१० टक्के आरक्षणाला मंजुरी देण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनोगतात मराठा आरक्षणामागील भूमिका मांडली. मराठा आरक्षणासाठी घेतलेला निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि टिकणारा आहे. त्यामुळे सर्व सदस्यांनी एकमताने हे विधेयक संमत करावे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या या विनंतीला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. विरोधी पक्षनेते विजय वडट्टेवारी यांनी बोलताना सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यास कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. हे विधेयक एकमताने मंजूर करण्यास आपला पाठिंबा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news