निवडणुक पुर्व हद्दपारीचे सत्र सुरु…
अकोला जिल्हयांतील गुंडप्रवृत्तीचे ०४ सराईत गुन्हेगार कलम ५६ मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत हद्दपार…
अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता याकरीता पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अकोला जिल्हयातील पोलीस स्टेशन सिव्हील लाईन हद्दीतील जाबदेणार
१. कुणाल प्रदिप देशमुख वय २३ वर्ष रा. फत्तेपुरवाडी, द्वारका नगरी, मोठी उमरी, अकोला तसेच पोलीस स्टेशन रामदास पेठ हद्दीतील जाबदेणार
२. भोला रामचंद्र तिवारी वय २७ वर्ष रा. पवनसुत अपार्टमेंट, तापडिया नगर, अकोला ता. जि. अकोला यांना मुंबई पोलीस अधिनियम कलम ५६ (अ) (ब) अन्वये मा. उपविभागीय दंडाधिकारी सा., अकोला यांचे आदेशाने दोन्ही जाबदेणार यांना अकोला जिल्हयातुन सहा महिन्याकरीता हद्दपार करण्यात आले आहे.
३. पोलीस स्टेशन अकोट शहर येथील अब्दुल सुलतान अब्दुल ईरफान वय २२ रा. ताजनगर, अकबरी प्लॉट, अकोट तसेच पोलीस स्टेशन अकोट ग्रामिण हद्दीतील जाबदेणार ४.
संतोष दिनकर काळे, रा. वडाळी देशमुख ता. अकोट जि. अकोला याला मुंबई पोलीस अधिनियम कलम ५६ (अ) (ब) अन्वये मा. उपविभागीय दंडाधिकारी सा., अकोट यांचे आदेशाने दोन्ही जाबदेणार यांना अकोला जिल्हयातुन सहा महिन्याकरीता हद्दपार करण्यात आले आहे.
पोलीस अधिक्षक बच्चन सिंग यांनी पदभार स्विकारल्यापासून अकोला जिल्हयातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या २७ सराईत गुन्हेगारांना अकोला जिल्हयातून हद्दार करण्यात आले आहे.
” अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांवर येणा-या निवडणुका आगामी सण उत्सव काळात एमपीडीए व इतर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे “असा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी दिला आहे.