कार दुचाकी अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू
पळसो बढे नजीकची घटना
बोरगाव मंजू
बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत पळसो नजीक कार दुचाकी अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना २१ मार्च गुरुवारी दुपारी दरम्यान घडली, विलास इंगळे वय ६५ असे मृतकाचे नाव आहे, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी क्रमांक एम. एच.३० ए. डब्ल्यू .३७६९ दुचाकी व कार क्रमांक एम एच ३० ए. एफ. ८८०९ या दोन वाहनांच्या अपघातात भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार विलास आत्माराम इंगळे वय ६५ रा पळसो (बढे) हे गंभीर जखमी झाले, जखमीस नातेवाईकांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी अंती मृत घोषित केले,घटनेची माहिती मिळताच ठाणेदार मनोज केदारे, हेडकॉन्स्टेबल कमलेश धर्माधिकारी, हेडकॉन्स्टेबल तुषार मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करुन दोन्ही अपघातग्रस्त वाहने पोलिस ठाण्यात जमा केले,तर घटनेनंतर कारचा चालक मिळुन आला नाही, सदर घटनेची फिर्याद सुनील इंगळे पळसो बढे यांनी पोलिसात फिर्याद दिली वरुन कार चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे, हेडकॉन्स्टेबल कमलेश धर्माधिकारी, तुषार मोरे सह पोलिस करीत आहेत.