वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर 27 मार्चला आपला उमेदवारी अर्ज भरणार!
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत मिळून लोकसभेची निवडणूक लढणार की, स्वतंत्र त्या बद्दल संभ्रम कायम आहे. मात्र आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर हे 27 मार्चला अकोला येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
काय म्हणाले ॲड. प्रकाश आंबेडकर
“मी मविआला त्यांच्या चार जागा परत करतोय. ते चार जागा बोलतात. पण बैठकीत अकोला आणि उर्वरित दोन जागा ऑफर केल्या. मविआचा 15 जागांचा तिढा अजून संपत नाहीय, तर मी कुठे जागा मागणार?” वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत मिळून लोकसभेची निवडणूक लढणार की, स्वतंत्र त्या बद्दल संभ्रम कायम आहे. प्रकाश आंबेडकर हे वांरवार आपली नाराजी बोलून दाखवतायत. “आमच्या मागणीला फार काही प्रतिसाद मिळाला नाही. आम्हाला कुठेतरी सामावून घ्यायच म्हणून त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्यांचं डिसीजन झालेलं नाही. आमचाही निर्णय झालेला नाही. मविआमध्येच काही मतदार संघांबाबत मतभेद आहेत. काँग्रेसने उमेदवार यादी जाहीर केली. पण मतभेद असलेल्या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केलेले नाहीत. काही मतदारसंघ सेनेने क्लेम केले आहेत” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“त्यांचं ठरलं ते आमच्या बरोबर बैठक करणार असतील, तर आम्ही सुद्धा तयार आहोत” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. संजय राऊत यांनी विधान केलं की, तुम्ही युती तोडल्याची घोषणा केली हे दुर्देवी आहे. “मी मविआला त्यांच्या चार जागा परत करतोय. ते चार जागा बोलतात. पण बैठकीत अकोला आणि उर्वरित दोन जागा ऑफर केल्या. मविआचा 15 जागांचा तिढा अजून संपत नाहीय, तर मी कुठे जागा मागणार?” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. पूर्व विदर्भात उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ आलीय. त्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “ज्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे, त्याला फॉर्म भरायला वेळ लागतो. ज्याचा असा कुठला रेकॉर्डच नाही, त्याचा फॉर्म दोन तासात भरुन होतो” आम्ही जे उमेदवार फायनल केलेत, त्यांचा रेकॉर्ड पाहिलाय. 27 तारखेला मी अकोल्यातून फॉर्म भरणार. मी माझ्या पक्षाच्या वंचितच्या वतीने लढणार” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. “2014, 2019 ची लाट आता नाहीय. त्यामुळे समोरच्या पक्षाला कमकुवत करुन आपण जिंकू अशी स्थिती निर्माण करायची ही त्यांची स्ट्रॅटजी आहे” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.असे एका खाजगी वाहिनीवर प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखवले. आता पुढे महाविकास आघाडी काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.