दुचाकीला रुग्णवाहिकेची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू
अकोला – शेतातून घरी जातांना बाळापूर रोड वरील कलकत्ता ढाब्याजवळ माखनचोरजवळ रुग्णवाहिका चालकाने दुचाकीला उडवले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माखनचोर जवळील शेतातून घरी परतणाऱ्या राजेश डोईफोडे यांना मागून येणाऱ्या रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिली.राजेश डोईफोडे यांचा जागीच मृत्यू झाला.सदर रुग्णवाहिका ही ओझोन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ची असल्याचे माहिती समोर आली आहे. रुग्णवाहिका चालकाकडे परवाना नसल्यामुळे तो दारूच्या नशेत रुग्णवाहिका चालवत असल्याचे समोर आल्याने लोकांनी रुग्णवाहिका चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.