खरिपातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही..
आमदार रणधीर भाऊ सावरकर
बोरगाव मंजू सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर खरेदी प्रारंभ
संजय तायडे बोरगाव मंजू – शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादन सह योग्य बाजारपेठ उपलब्ध असली तरच शेतकऱ्यांची आर्थिक घडी सुधारणा होईल, या हेतूने शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून आजही कापसाचा उल्लेख केला जातो,मात्र खरिपातील सोयाबीन व कापूस इतर पिकांचे नुकसान झाले, अश्या कठीण काळात खरिपातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अकोला पुर्व आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी सर्वोतोपरी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे समर्थ आहे असे आवाहन केले, बोरगाव मंजू येथील अजमेरा जीनिंग फॅक्टरी सीसीआय कापूस खरेदी शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते, दरम्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अनुप भाऊ धोत्रे हे होते तर उद्घाटन अकोला पुर्व आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या हस्ते सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर खरेदी प्रारंभ झाला, प्रसंगी खासदार अनुप भाऊ धोत्रे यांनी सांगितले की बोरगाव मंजू कापूस खरेदी केंद्रावर परिसरातील उत्पादक शेतकऱ्यांना थेट कापूस विक्री नंतर थेट लाभ होईल, तसेच पारदर्शक खरेदी प्रक्रिया योग्य हमीभाव वेळेस पैसे जमा होतील तसेच उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर प्रयत्न केले जातील असे आश्वासन खासदार अनुप भाऊ धोत्रे यांनी दिले,प्रसंगी प्रमुख उपस्थिती सीसीआय केंद्र प्रमुख अमित कोल्हे, संचालक प्रकाश काळे, जिंनिग संचालक ललित अजमेरा, भाजपा तालुका सरचिटणीस तथा माजी सरपंच जयकृष्ण ठोकळ पाटील, संजय गावंडे, दिनेश काळे, योगेश गोतमारे, सुबोध गवई, बंटी मांगे, गजानन बरडे, पंकज वाडेवाले आदी सह शेकडो शेतकरी उपस्थित होते,
दरम्यान अजमेरा सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर आठ ते बारा अद्रकता असलेल्या कोरडा कापूस सह खरेदी ५.५ पासून १२ क्विंटल पर्यंत दिनांक ३१ मार्च पर्यंत सुरू राहील अशी माहिती जिनिग संचालक ललित अजमेरा यांनी सांगितले, दरम्यान आपल्या प्रास्ताविकातून डॉ योगेश अजमेरा सीसीआय कापूस खरेदी केंद्र यांनीही आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की सशक्त शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी व समस्या सोडविण्यासाठी खरेदी केंद्रावर विशेष लक्ष दिले जाईल असे आश्वासन दिले तर आभार गजानन बरडे यांनी केले


