अकोला काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) फॉर्म्युला ठरला..
आगामी महानगरपालिका निवडणूकच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.अकोला महापालिका करिता दोन्ही पक्षांची आघाडी निश्चित झाली आहे.
एकंदरीतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी ( श. प ) च्या युतीने आघाडी घेतली असून काँग्रेस 80 पैकी 55 जागेवर आपले उमेदवार देणार आहे तर शरद पवारांची राष्ट्रवादी ही 25 जागांवर लढणार आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष उबाठा , काँग्रेस सोबत अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढणार आहे.
राजकीय वर्तुळात या लढतीकडे राजकीय मुकाबल्याच्या रूपात पाहिले जात आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले असून आज आणि उद्या महायुती आणि इतर पक्षाची आघाडी युती स्पष्ट होणार आहे..

