अकोल्याचे माजी महापौर विजय अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, नामांकनात भाजपची आघाडी..
अकोल्यातून मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. अकोल्याचे माजी महापौर तथा भाजपचे ज्येष्ठ नेते विजय अग्रवाल यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीतील जागावाटपावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच भाजपचे महानगराध्यक्ष असलेले विजय अग्रवाल यांनी भाजपकडून सर्वप्रथम अधिकृतरित्या नामनिर्देशन अर्ज सादर केला आहे.विशेष म्हणजे, अकोल्यात भाजपने अद्याप अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नसतानाही आतापर्यंत भाजपच्या एकूण सहा उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे नामांकन प्रक्रियेत भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

