राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. हा विमान अपघात बारामतीत झाला. अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू या विमान अपघातात झाला. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळी बारामतीमध्ये सभा असल्याने अजित पवार हे मुंबईहून बारातमीकडे रवाना झाले होते. मात्र, लॅडिंगदरम्यान हा अपघात झाला. ज्यावेळी विमान जमिनीवर कोसळले त्यावेळी विमानाला मोठी आग लागली. या अपघातानंतर लगेचच मदतकार्य राबवण्यात आले. पण अजित पवारांसह 6 जणांचा अपघातात मृत्यू झाला.
जिल्हा परिषद आणि पंचाय समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादांनी प्रचार सुरू केला होता. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आल्या होत्या. महानगर पालिका निवडणुकीचा निकाल पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांनी प्रचाराला वेग घेतला होता. हा अपघात नेमका कशामुळे झाला. तांत्रिक बाब काय, या सर्व प्रकरणाची चौकशी विमानतळ प्रशासनाने सुरू केली आहे.
हे छोटेखानी विमान लँडिंगदरम्यान विमान कोसळलं. विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. बारामतीमधील या भीषण विमान अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती DGCA ने दिली आहे. लँडिंग करताना काही तांत्रिक दोषामुळे विमान कोसळले आणि त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. याठिकाणी धूराचे मोठे लोट आले. तर विमानाला मोठी आग लागली. त्यात हे विमान जळून खाक झाले. या भीषण अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आल्याने कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राला मोठा धक्का बसला.

