अकोला – भारतीय जनता पार्टी, अकोला जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 5 नगर परिषद व 1 नगर पंचायत यांसाठी नगराध्यक्ष पदांच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे प्रभारी मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे, प्रभारी भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, पालकमंत्री ऍड. आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
उमेदवार निवड प्रक्रिया संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, प्रभारी डॉ. अमित कावरे, विजय अग्रवाल, जयंत मसने, जयश्री पुंडकर, योगेश गोतमारे तसेच संचालन निवड समिती यांच्या शिफारशीवर अंतिम करण्यात आली.
⭐ BJP कडून जाहीर करण्यात आलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
1️⃣ अकोट नगर परिषद
-
ओबीसी महिला
-
सौ. माया विवेकराव धुळे
(भाजपा महिला आघाडी सरचिटणीस)
2️⃣ मुर्तीजापूर नगर परिषद
-
सर्वसाधारण
-
श्री. हर्षल रामेश्वर साबळे
(भाजपा शहराध्यक्ष)
3️⃣ हिवरखेड नगर परिषद
-
नामनिर्देशित प्रवर्ग (महिला)
-
सौ. सुलभा रमेश दुतोंडे
(माजी जिल्हा परिषद सदस्या)
4️⃣ तेल्हारा नगर परिषद
-
अनुसूचित जाती (महिला)
-
सौ. वैशाली जितेंद्र पालीवाल
5️⃣ बाळापूर नगर परिषद
-
नामनिर्देशित प्रवर्ग (महिला)
-
सौ. धनश्री चैतन्य अंबाडे
6️⃣ बार्शीटाकळी नगर पंचायत
-
सर्वसाधारण (महिला)
-
सौ. कोकिळा श्रीराम येळवणकर
भाजपा नेतृत्वाचा विश्वास
जुन्या–नव्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग, मतदारांचा विश्वास आणि संघटनाच्या बळावर भारतीय जनता पक्ष या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निश्चितच उत्तम यश मिळवेल, असा विश्वास भाजपा सरचिटणीस माधव मानकर, ऍड. रूपाली काकड, अंबादास उमाळे आणि राजेश नागमते यांनी व्यक्त केला.

