अकोला:- मागील सात आठ वर्षापासून बांधकाम विभागातील थकीत असलेल्या तिन ते चार कोटींच्या बिलाची प्रशासकीय मान्यता घेऊन काढण्यात येणार असल्याची सुत्राकडून माहीती मिळाली आहे. ही रक्कम मनपा फंडातून देण्यात येत असल्यामुळे कर्मचारी वर्गात कमालीचा रोष निर्माण होऊन मनपा आयुक्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या रक्कम करीता कानकुन करत असुन एका मोठ्या कत्राटदाराला इतक्या मोठ्याप्रमाणात देयक कशी काय देऊ शकतात? ती पण गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असल्यावरही यावर सत्ताधारी म्रृगगिळून का बसले आहेत तर विरोधी पक्षातील सदस्यांनी यावर आक्षेप का नाही नोंदवला याची चर्चा मनपा वर्तुळात होत आहे. शहरात सक्तीने करवसुली वर भर देऊन सामान्य नागरिकांना अडचणीत आणून कर रूपात जमा झालेला मनपा फडातील पैसा येणाऱ्या दिवसात कत्राटदाराच्या घशात घालणार असल्याची माहिती आहे. यावर अकोला महानगरपालिका मध्ये घमासान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पैशावर डल्ला?
एकीकडे मनपा आयुक्त कर्मचाऱ्यांना ‘सातव्या वेतन आयोगाचा’ फरक आणि इतर हक्काची देणी देण्यास टाळाटाळ करत असताना, अचानक एका मोठ्या कंत्राटदारावर ही मेहेरबानी का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली देयके अचानक काढण्यामागे नक्की कोणाचे ‘हित’ दडले आहे, याची चर्चा आता मनपा वर्तुळात रंगू लागली आहे.
सत्ताधारी मौन, तर विरोधक सुस्त?
एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी कंत्राटदाराच्या घशात घातला जात असताना सत्ताधारी पक्षाने ‘मृगगिळून’ बसण्याची भूमिका घेतली आहे. तसेच, जनतेच्या पैशाच्या या उधळपट्टीवर विरोधी पक्षातील सदस्यांनीही अद्याप कोणताही आक्षेप नोंदवलेला नाही. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांचे या विषयावर ‘साटेलोटे’ तर नाही ना? असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.
सामान्य जनतेच्या कराची उधळपट्टी
शहरात सध्या सक्तीने करवसुली मोहीम राबवली जात आहे. आर्थिक संकटात असलेल्या सामान्य नागरिकांना अडचणीत आणून वसूल केलेला हा कराचा पैसा विकासासाठी वापरण्याऐवजी, कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी वापरला जात असल्याचा आरोप होत आहे.
संजय राठी प्रकरणाची पुनरावृत्ती होणार का?
मनपा प्रशासनातील या आर्थिक ओढाताणीमुळे आणि दबावामुळे अधिकारी प्रचंड दहशतीत आहेत. यापूर्वीच्या अशाच काही प्रकरणांमुळे अधिकारी संजय राठी यांनी टोकाचे पाऊल उचलले होते. आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली असून, जर नियमांना डावलून ही देयके काढली गेली, तर मनपामध्ये मोठे ‘घमासान’ होण्याची चिन्हे आहेत.

