पोलीस स्टेशन डाबकी रोड येथील खुनाच्या गुन्हयातील आरोपीतांना अवघ्या ६ तासात अटक
पो.स्टे डाबकी रोड अकोला येथे दिनांक १८. मार्च २०२६ चे रात्री अंदाजे १२ वाजतो दरम्यान यातील फिर्यादी शेख तनवीर शेख नासीर वय १९ वर्षे व्यवसाय-वेल्डींग काम जात-मुस्लीम, रा. भगतवाडी गल्ली कं ०७, डाबकी रोड, अकोला हा व त्याचा मित्र शेख मविस अमन मो. आजम रा. जोगळेकर प्लॉट, अकोला असे सिगारेट पिण्या करीता डाबकी रोड, मेन रोड, निराळे यांचे पानपटटीवर गेले असता त्या ठिकाणी यातील आरोपी नामे अर्जुन नरेंद्र धनावत असे फिर्यादी, मृतक व आरोपी असे पानपटटीमध्ये एकत्र सिगारेट पित असतांना आरोपीाने यातील मृतक मविस यास म्हटले की, ‘तु मेरे तरफ क्या देख रहा’ असे म्हणुन वाद करून आरोपी अर्जुन धनावत व इतर दोन साथीदारांनी मिळून मृतक व फिर्यादीस मारहाण करून मृतक यास चाकुन पोटात वार करून जिवानिशी ठार मारले अशा फिर्यादीने दिलेल्या फिर्याद व मृतकचे मेडीकल मेमो वरून अप.क. २३४/२०२६ कलम १०३,११५(२), ३ (५) बिएनएस प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्हयाची गंभीरता लक्षात घेता व गुन्हयातील इतर दोन आरोपी निष्पन्न नसल्याने मा. पोलीस अधीक्षक सा. अकोला यांनी पो.स्टे. डाबकी रोड येथे स्वतः हजर येवुन सुत्र हातात घेवुन आरोपी निष्पन्न व शोध करीता वेगवेगळे पोलीस स्टेशन व स्थागुशा असे एकुण ८ पथके तयार करून अत्यंत सचोटीने गुन्हयातील आरोपीतांचे शोध करीता रवाना करून स्वता संपुर्ण पथकांचे नियत्रंण करून तांत्रिक पुरावा व गोपणियतेच्या आधारे केलेल्या प्रयत्नातुन पो.स्टे. खदान येथील पोलीस पथकाला गुन्हयातील आरोपी नामे १) अर्जुन नरेंद्र धनावत वय २३ वर्ष रा. आश्रय नगर, डाबकी रोड, अकोला, २) अनिकेत संजय बाळापुर क्य १८ वर्ष रेणुका नगर, डाबकी रोड, अकोला, ३) विशाल दिलीप सिरसोले वय २३ वर्ष रा. गायत्री नगर, बाळापुर रोड, अकोला असे मिळुन आल्याने त्यांना सदर गुन्हयात ताब्यात घेवुन पो.स्टे. डाबकी रोड यांचे ताब्यात दिले.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक अर्चित चांडक साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील साहेब यांचे मार्गदर्शनामध्ये पोनि मनोज केदारे पो.स्टे. खदान, पोनि दिपक कोळी, पो.स्टे. डाबकी रोड, अकोला , सपोउपनि संजय वानखडे, पोहवा गिरीष विर, पोकॉ संदीप काटकर, भुषन मोरे पो. स्टे, खदान यांनी केली आहे.

