अकोला हादरले! पीकेव्ही परिसरातील नाल्यात मुलाचा मृतदेह; ‘सर्वज्ञ निंबाळकर’ असण्याची शक्यता?
अकोला (प्रतिनिधी):
अकोला शहरात आज सकाळच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. शहरातील मुख्य वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या पीकेव्ही (PKV) विद्यापीठाच्या मुख्य गेटसमोरील नाल्यात एका बालकाचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चि. सर्वज्ञ निलेश निंबाळकर याचा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नेमकी घटना काय?
आज रविवारी सकाळी काही नागरिकांना पीकेव्ही गेटसमोरील नाल्यात एक मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह नाल्यातून बाहेर काढला असून प्राथमिक पाहणीत तो मुलगा ११ वर्षांचा असल्याचे शक्यता आहे
पोलीस तपास सुरू
हा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हा केवळ अपघात आहे की यामागे काही घातपात आहे? या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

