रिधोरा हादरले! शेत शिवारात आढळला कुजलेला मृतदेह; हत्या की आत्महत्या?
अकोला: रिधोरा शेत शिवारामध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार उघडकीस येताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. ही आत्महत्या आहे की घातपात, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.


