🚨 अकोल्यात युवकावर प्राणघातक हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू!
अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सत्यम गवई या युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धारदार शस्त्राने झालेल्या या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सत्यमचा सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही जणांनी युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्याला तात्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
या घटनेनंतर एमआयडीसी परिसरात आणि सर्वोपचार रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.
