आज रिसोड येथे लग्नासाठी जात असताना एका तरुण युवकाचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर तो युवक जीवन-मरणाशी झुंज देत असल्याचे दिसून आले. ही परिस्थिती पाहून तत्काळ गाडी थांबवून एमर्जन्सी कॉल करण्यात आला. अति दक्षता ॲम्ब्युलन्स तसेच मालेगाव पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती देऊन आवश्यक कारवाई करण्यात आली.
जखमी युवकाला प्राथमिक उपचारासाठी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. यावेळी मी स्वतः किरणकुमार निमकडे, तसेच डॉ. भिसे साहेब आणि विलास धोंगळे यांनी अत्यंत तातडीने आणि संवेदनशीलतेने मदतकार्य केले.
सदर युवक हा अकोला जिल्ह्यातील असून तो MH 30 BZ 2509 क्रमांकाच्या शाईन कंपनीच्या दुचाकीवरून मालेगावकडे जात असताना हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
मात्र, त्या युवकामध्ये जीवन जगण्याची प्रबळ तळप असल्याने आणि सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे त्याचे प्राण वाचवण्यात यश आले.

