पीक स्पर्धेत शेतक-यांनी सहभाग घेण्याचे आवाहन

  पीक स्पर्धेत शेतक-यांनी सहभाग घेण्याचे आवाहन

        अकोला, दि. 21 : पीकस्पर्धा योजनेत जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

पीक स्पर्धेत अन्नधान्य, कडधान्य व गळित धान्य तूर, मूग, उडीद, मक्का. ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन, सुर्यफुल व भूईमूग या प्रमुख पिकांचा समावेश आहे.

स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी उडीद व मूग या पिकांसाठी 31 जुलै व इतर पिकांसाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले अर्ज नजिकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे तसेच आपल्या गावातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news