शहरातील पाणी पुरवठा 3 दिवसासाठी बंद राहणार – मनपा प्रशासन

शहरातील पाणी पुरवठा 3 दिवसासाठी बंद राहणार – मनपा प्रशासन

अकोला दि. 21 जुलै 2023 – अकोला शहरातील नागरिकांना कळविण्‍यात येते कि, केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत Scada व Automation चे कामामधील Flowmeter बसविणे व valve बसविण्याचे कामासाठी 65 MLD जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा दि. 23, 24 व 25 जुलै 2023 रोजी बंद राहील.  ज्‍यामध्‍ये महाजनी प्लॉट, तोष्णीवाल लेआऊट, आदर्श कॉलोनी, केशव नगर, नेहरु पार्क, रेल्वे स्टेशन, अकोट फैल, गंगा नगर, जोगळेकर प्लॉट, लोकमान्य नगर, गुडधी, उमरी, शिवणी, शिवर जलकुंभांचा समावेश असून या जलकुंभ परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

 तसेच 25 MLD प्लांट वरून होणारा शिव नगर आश्रय नगर व बस स्टॅन्ड मागील जलकुंभावरून होणारा पाणी पुरवठा सुरळीत राहणार आहे, कृपया याची नोंद संबंधीत भागातील नागरिकांनी घेऊन मनपा प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती. तसेच अकोला शहरातील नागरिकांनी पाण्‍याची पुरेशी साठवणूक करून पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या अपव्‍यय टाळून सहकार्य करावे असे आवाहन मनपा पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोईफोडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news