जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांच्या आदेशाला न जुमानता पश्चिम झोन क्षेत्रीयअधिकारी करतो आहे मनमानी !

जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांच्या आदेशाला न जुमानता पश्चिम झोन क्षेत्रीयअधिकारी करतो आहे मनमानी !

रस्त्यावरील अतिक्रमण काढा मागणीसाठी स्थानिक रहिवाशांनी अनेकदा दिले निवेदन

अकोला. जुने शहरातील शांतता नगर भागातील रहिवासी यांनी पुरुषोत्तम साबळे यांच्या घरापासून ते सुधीर चौधरी यांचे घरापर्यंत रस्त्यावर असलेल्या वीस फुटाच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून टाकण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांच्याकडे निवेदन दिलेली आहेत तसेच याच मागणीसाठी तीनदा आमरण उपोषण सुद्धा केले आहे मात्र या दोन्हीही जबाबदार अधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता पश्चिम झोन अधिकारी आपली मनमानी चालवत असल्याने त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

जुने शहरातील शांतता नगर भागातील रहिवासी पुरुषोत्तम साबळे यांच्या घरापासून ते सुधीर चौधरी यांचे घरापर्यंत असलेल्या पूर्वेकडील रस्त्यावर वीस फुटाच्या रस्त्यावरील दहा फूट अतिक्रमण झालेले आहे त्यातच उर्वरित रस्त्यावर. वाहनधारक आपली वाहने उभी करत असल्याने येथे रस्त्याचे अस्तित्वच संपुष्टात येते तर याच रस्त्याच्या उत्तर दक्षिण ला पुरुषोत्तम साबळे यांच्या एका खोलतून ८ फूट रस्ता ती खोली जमीनदोस्त करून विकास करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामूळे याच भागातील रहिवासी सुधीर शेषराव चौधरी, सुनील नागपुरे, विनोद सोनटक्के, व इतर नागरिकांनी या रस्त्यावरील अतिक्रमण काढून टाकण्यासाठी ४ऑगस्ट २०२० पासून ते २७ डिसेंबर २०२२ पर्यंत अनेकदा जिल्हाधिकऱ्यांकडे आणि मनपा आयुक्तांना सोबतच पालकमंत्री, जिल्हा पोलिस अधीक्षकआणि लोक अदालत आणि शासनाच्या पंधरवाडा अभियानात हि निवेदने देऊनही क्षेत्रीय अधिकारी करवाई करत नसल्याने अखेर याच भागातील रहिवासी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आमरण उपोषणाला बसले होते तरीहि करवाई झाली नसल्याने सन २०२३ च्या प्रजासत्तकदिनी आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता त्यावेळी पश्चिम झोन क्षेत्रीय अधिकारी जाधव आणि टापरे नामक अधिकाऱ्यांनी आणि इंजी टेकाडे यांनी हे अतिक्रमणं हटविण्याचे आश्वासन दिले होते तर तत्कालीन जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनीहि संबधीत अतिक्रमणं हटविण्याचे आदेश दिले होते मात्र अजूनही ते संबधीत अतिक्रमणं जसेच्या तसेच आहे त्यामूळे या मार्गावरील अतिक्रमण धारकाला अभय देणाऱ्या त्या अधिकाऱ्यांवर पहिल्यांदा कारवाई करावी व नंतर ते अतिक्रमन हटवून मनपाचे विकास कामे करावीत अशी मागणी या मार्गावरील रहिवासी नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news