मनपा आयुक्‍त यांच्‍या दालनात सार्व‍जनिक गणेशोत्‍सव मंडळाच्‍या पदाधिका-यांची बैठक संपन्‍न.    

मनपा आयुक्‍त यांच्‍या दालनात सार्व‍जनिक गणेशोत्‍सव मंडळाच्‍या पदाधिका-यांची बैठक संपन्‍न.    

अकोला दि. 21 ऑगस्‍ट 2023 –  अकोला महानगपालिका क्षेत्रामध्‍ये गणेशोत्‍सव सण हा मोठ्या उत्‍साहाने साजरा करण्‍यात येत असतो. त्‍या अनुषंगाने आज दि. 21 ऑगस्‍ट  2023 रोजी मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या दालनात सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळच्‍या पदाधिकारी यांची सार्वजनिक गणपती उत्‍सव च्‍या अनुषंगाने बैठक संपन्‍न झाली आहे.

          या बैठकीमध्‍ये मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे काढणे, रस्‍त्‍याची डागडुजी करणे, पथदिप व्‍यवस्‍था  करणे, मनपात एक खिडकी योजनाची सुविधा एक आठवडापुर्वी सुरू करणे आदिंबाबात चर्चा झाली. तसेच 5 वर्षा पेक्षा जास्‍त असलेले जुने गणेश मंडळांना पुनः परवानगी घेण्‍याची गरज नसून त्‍यांनी फक्‍त नुतनीकरण (रिनीव्‍हल) साठी लागणारे कागदपत्रे आणून परवानगी नुतनीकरण करून घ्‍यावी असे मनपा आयुक्‍त तथा प्रशासक यांनी यावेही म्‍हटले आहे. याचसोबत सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळ च्‍या पदाधिकारी यांनी आपल्‍या  शहरात पर्यावरणपुरक गणेशोत्‍सव साजरा करणे संदर्भात तसेच गणेश मुर्ती ह्या जास्‍त उंचीची नसाव्‍या  याबाबत शहरातील सर्व मंडळांना अवगत करावे.

          मागील गणेशोत्‍सव सोहळ्यात चांगल्‍या प्रकारे नियोजन व सहकार्य केल्‍या बद्दल सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळच्‍या पदाधिकारी यांनी मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांचे पुष्‍प गुच्‍छ देऊन सन्‍मान केला.

          या बैठकीत मनपा उपायुक्‍त गीता वंजारी, सहा.संचालक नगर रचना आशिष वानखडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, सहा.नगर रचनाकार राजेंद्र टापरे, सहा.अतिक्रमण अधिकारी चंद्रशेखर इंगळे, बाजार/परवाना विभागाचे राजेश सोनाग्रे, सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाचे अध्‍यक्ष अॅड.मोतीसिंह मोहता, महासचिव सिध्‍दार्थ शर्मा, विजय जयपिल्‍ले, विजय तिवारी, कार्याध्‍यक्ष हरिष आलिमचंदानी, सचिव संतोष पांडे, निरज शाह, मनोज शाहू, सह सचिव मनीष हिवराळे, अॅड.सुरेश ढाकोलकर, दिलीप खत्री, कोषाध्‍यक्ष जयंत सरदेशपांडे आदिंची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news