अकोला जिल्ह्यातील कृत्रिम युरीया टंचाई विरोधात कृषी सभापती कडून कानउघाडणी, कृषी विभागाने दक्ष राहून काम करण्याचे निर्देश.

अकोला जिल्ह्यातील कृत्रिम युरीया टंचाई विरोधात कृषी सभापती कडून कानउघाडणी, कृषी विभागाने दक्ष राहून काम करण्याचे निर्देश.

अकोला, दि. २२ – वंचित बहुजन युवा आघाडीने काल जिल्ह्यातील कृत्रिम युरीया टंचाई विरोधात केलेल्या आंदोलानंतर जिल्हा परीषद कृषी सभापती योगिता रोकडे ह्यांनी आज तातडीने कृषी विभागाचा आढावा घेत जिल्हा व तालुका स्तरावर शेतकऱ्याना होत असलेल्या त्रासा साठी त्यांना धारेवर धरले आणि कृषी विभागाने दक्ष राहून काम करण्याचे निर्देश त्यांना दिले.ह्या प्रसंगी भारिप बमसं प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने, वंचित युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्ह्यात २६०० टन युरिया उपलब्ध असताना शेतकऱ्याना तो मिळत नसल्याने वंचित बहुजन युवा आघाडीने काल जिल्हा कृषी अधीक्षक ह्यांना थेट कृषी सेवा केंद्र दाखवत तेथील शेतकरी विरोधी कामकाज दाखवून दिले होते. कालच्या आंदोलन मुळे आणि युवा आघाडीने मागणी केल्या नुसार आज जिल्हा कृषी अधीक्षक ह्यांनी जिल्ह्यात युरिया खताच्या सर्वत्र उपलब्धतेसाठी संरक्षित साठ्यातून प्रत्येक तालुक्यातील विक्रेत्यांकडे खत उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, यापुढेही जिल्ह्यात आवश्यक पुरवठ्यासाठी या आठवड्यात युरिया उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक करीत कृषी केंद्राची यादी प्रसिद्ध करीत त्यात असलेला साठा देखील जाहीर केला आहे.
आधीचा २६०० टन साठा व आता उपलब्ध ३१२.१३८ मे. टन साठा ह्याचे नीट नियोजन करा अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत घोगरे व महासचिव राजकुमार दामोदर आणि अकोला तालुका युवा अध्यक्ष मिलिंद दामोदर ह्यांनी कृषी सभापती ह्यांना केली होती.त्यावर कृषी सभापती ह्यांनी आज तातडीने जिल्हा परीषद कृषी विभागातील सर्व जिल्हा तालुका कृषी अधिकारी ह्यांना पाचारण करून आढावा घेतला.कालच्या आंदोलन व स्ट्रिंग ऑपरेशन आणि गोडाऊन पंचनामा तसेच जिल्ह्यात शेतकरी फसवणूक व त्रासाच्या घटना युवा आघाडीने विशद केल्या त्यावर तातडीने शेतकऱ्या साठी हेल्प लाईन नंबर सुरू करून आधीच्या खत साठा व संरक्षित खत साठा नियोजन करून कुठलाही शेतकरी वंचीत राहणार नाही ह्याची दक्षता घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

आज रोजी संरक्षित साठ्यातून एकूण ३१२.१३८ मे. टन युरिया प्रत्येक तालुक्यातील विक्रेत्यांकडे उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार दि. २१ ऑगस्ट रोजी विक्रेत्यांकडे उपलब्ध युरिया खत साठा पुढीलप्रमाणे (परिमाण मे. टन) : अकोला तालुक्यात महाराष्ट्र ट्रेडर्स, कुरणखेड (१७.५५), पाणी ट्रेडर्स, अकोला (२५.३३५), संदेश कृषी सेवा केंद्र, मजलापूर (११.७), सुजय कृ. से.कें., दहीहंडा (११.७), अकोट तालुक्यात अकोट तालुका सेवा सह. संस्था कृ. से. केंद्र (१०.१२५), नीलेश ॲग्रो, सावरा (१२.१५), श्री स्वामी समर्थ केंद्र, मुंडगाव, (१२.१५), वृषाली ॲग्रो सेंटर, अकोट (१३.९२३), बाळापूर तालुक्यात गणपती अॅग्रो, निंबा फाटा (२५.२), ठाकरे कृ. से. कें., हातरुण (९.६७५), शिवकृपा कृ. से. कें., निमकर्दा त्याचप्रमाणे, बार्शिटाकळी तालुक्यात यांनी सांगितले.

कें., दहीहंडा (११.७), अकोट तालुक्यात अकोट तालुका सेवा सह. संस्था कृ. से. केंद्र (१०.१२५), नीलेश ॲग्रो, सावरा (१२.१५), श्री स्वामी समर्थ केंद्र, मुंडगाव, (१२.१५), वृषाली ॲग्रो सेंटर, अकोट (१३.९२३), बाळापूर तालुक्यात गणपती अॅग्रो, निंबा फाटा (२५.२), ठाकरे कृ. से. कें., हातरुण (९.६७५), शिवकृपा कृ. से. कें., निमकर्दा (१०.५७५) खत उपलब्ध आहे.

बार्शिटाकळी तालुक्यात आनंद ट्रेडर्स (१४.०४), माऊली कृ. से. कें., बार्शीटाकळी ( ५.४९), लोककल्याण शेतकरी से. कें., पिंजर (१२.१५), गोकुळ कृ. से. कें., महान ( ७.६५), मूर्तिजापूर तालुक्यात महालक्ष्मी ॲग्रो एजन्सी (२५.६५), मूर्तिजापूर तालुका सह. संस्था कृ. से. कें. (१०.१२५), तेल्हारा तालुक्यात दधिमती कृ. से. कें. (१८.६७५), जय गजानन कृ. से. कें., माडेगाव बाजार (५.१७५), पातूर तालुक्यात दीपा कृ. से. कें., पातूर (११.०२५), हनुमान कृ. से. कें. आशोला (११.७), सियाराम कृ. से. कें. अंबाशी (११.७), गायत्री कृ. से. कें., सस्ती (१०.१२५). दत्त कृ. से. कें., पातूर ( ८.५५) इतका साठा उपलब्ध आहे.

जिल्ह्यात खतांची कमतरता भासू नये यासाठी सर्व कामकाज नीट करण्याची हमी जिल्हा परीषद कृषी विकास अधिकारी साळके ह्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news