युवकाचा गळा आवळून खून! आत्महत्येचा बनाव

युवकाचा गळा आवळून खून! आत्महत्येचा बनाव

पातूर तालुक्यातील भंडारज खुर्द येथील घटना; दोन आरोपींना अटक

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

दि.1/09/2023 पातुर- तालुक्यातील भंडारज खुर्द येथे एका ३७ वर्षीय युवकाचा मारहाण करून खून करून त्याला फासावर लटकवून आत्महत्येचा बनाव करण्यात आला. परंतु एका गावकाऱ्याने दाखवलेल्या समय सुचकतेमुळे हा बनाव उघडकीस आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशा प्रकारे आहे की,यातील फिर्यादी यांनी दिनांक ०१/०९/२०२३ रोजी फिर्यादी सरतर्फे मपो. उपनिरीक्षक मिरा वसंतराव सोनुने पो.स्टे. यांनी फिर्याद सादर केली की, दिनांक ३०/०८/२०२३ रोजी २०/०० वा. ते दिनांक ३१/०८/२०२३ चे ०९/०० वा.पावेतो नाईट ऑफीसर म्हणुन पो.स्टे. पातूर येथे कर्तव्यावर हजर असतांना मा.पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांना माहीती मिळाली की, भंडारज खुर्द येथे एका गळफास घेतलेल्या ईसमाचे प्रेत खाली उतरवुन ग्रामपंचायत सद्स्य व त्याचे नांतेवाईक हे स्मशानभुमीत प्रेत घेवुन जात आहेत. अशा प्राप्त माहीती वरुन पातूर पोलीस घटनास्थळी रवाना झाले असता भंडारज येथील स्मशान भुमीत मृतकाची विल्हेवाट लावण्याकरीता सरण रचुन त्यावर मृतकचे प्रेताला अग्नी देण्याचे तयारीत असतांना दिसून आले.

असता आरोपी संजय मोतीराम इंगळे रा.भंडारज खु. याची चौकशी केली असता मयत मिलींद यास अटॅक आलेला आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारची कारवाई करायची नाही किंवा आमची काहीही तक्रार नाही, असे म्हणुन उडवा उडविचे उत्तरे देत होते. यावेळी मृतकाचे शवविच्छेदन करुन घेतले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मृतकाचे मरणाचे कारण “Asphyxia Due To Ligature Strangulation” असा अभिप्राय दिलेला आहे. त्यावरून व प्रेताची विल्हेवाट (अंत्यविधी) करण्यासाठी केलेल्या तयारी वरुन असे दिसुन येते की, संजय मोतीराम इंगळे व ज्योती संजय इंगळे यांनी मृतकाचे कुटुंबाकडे असलेली नाल्याकडील १ एकर शेती ही आरोपी संजय याला हवी होती ती मृतक मिलींद याने देण्यास नकार दिला होता. तसेच मृतक याचेकडे पक्के घर होते त्या घरामध्ये संजय इंगळे हा कुटुंबासह राहत होता.

ते घर आरोपी संजय इंगळे व त्याची पत्नी ज्योती इंगळे यांना हवे होते. याच घरामध्ये मृतक हा सात ते आठ दिवसापुर्वी राहण्यास आला होता याचा मनात राग धरून आरोपी संजय इंगळे व सौ. ज्योती संजय इंगळे यांनी संगणमत करुन दि. ३०/०८/२०२३ रोजी २०/३० वा चे पुर्वी मृतक याचा गळा आवळुन खुन केला. व पुरावा नष्ट करण्याचे हेतुने त्याचे प्रेताची परस्पर विल्हेवाट लावण्या करीता प्रेत अंत्यविधी करीता स्मशान भुमीत घेवुन गेले.व पुरावा नष्ट केला. तसेच संजय इंगळे यास खरी परिस्थती माहीती असतांना त्याने मर्ग क्रमांक ३३/२०२३ कलम १७४ जा.फौ.मधील जबानी रिपोर्ट हा खोटा दिला असे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने नमुद आरोपी विरुध्द अप.क्र.४१७/२३ कलम ३०२,२०१,२००,३४ भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करुन सदर गुन्हयातील आरोपी संजय मोतीराम इंगळे (वय 52) व ज्योती संजय इंगळे (वय 48) दोघेही रा.भंडारज खुर्द यांना अटक करण्यात आली असून अधिक तपास पातूर पोलीस करीत आहेत.

सहाय्यक पोलीस अधीक्षक पातूर ठाण्यात
सहाय्यक पोलीस अधीक्षक (ips) रितू खोकर ह्या पातूर पोलीस ठाण्यात आल्या असून दोन संशयित यांची चौकशी सुरू केली आहे त्याच्या सोबत पातूर ठाणेदार किशोर शेळके हे सुद्धा चौकशी करीत आहेत.

प्राथमिक शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे त्यामध्ये हि आत्महत्या नसून गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे नमूद आहे दोन लोकांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.

किशोर शेळके
ठाणेदार पातूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news