अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये चक्क ‘बकरीचा फॅशन शो’

मोठ्या शहरात अनेक फॅशन शो आपण पहिले असतील. पण अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये चक्क ‘बकरीचा फॅशन शो’ आयोजित करण्यात आला होता…..

या ‘फैशन शो’मध्ये ‘मोडेल बकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. ‘जोरदार’ अन ‘झकास’ ‘रैम्प वॉक’ही झालाय अन हजारोंच्या बक्षिसांची लयलूटही…. बरं, ‘फैशन’सोबतच या ‘शो’मध्ये सामाजिक भानसुद्धा जपल्या गेलेय. कसा असेल हा फैशन शो?…खरंच, शेतात आणि रस्त्यावर चालणाऱ्या बकऱ्यांचा रॅम्प वॉक’ कसा झाला असेल?, अशा असंख्य प्रश्नांचे काहूर तुमच्या डोक्यात उठले असेल ना… तर चल जाऊयात या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी थेट अकोला जिल्ह्यातील अकोट येथील बकऱ्यांच्या फैशन शो’मध्ये….

 मी कशाला आरश्यात पाहू ग… मी कशाला बंधनात राहू ग… मीच माझ्या रूपाची राणी ग… असं गाणं म्हणत, अकोल्यातील अकोट येथे बकऱ्या सजून धजून ठुमकत ठुमकत रॅम्प वॉक करत होत्या, अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये लोकांच्या ओठी एकच प्रतिक्रिया सहज उमटत होती., ‘काय मस्त सजवल्या बकऱ्या !’ ….’काय सुंदर दिसतायेत हो बकऱ्या’… निमित्त होत अकोटच्या ‘जे.सी.आय.’ या संस्थेने आयोजित केलेल्या ‘ बकऱ्यांच्या फैशन शो’चे…. .ही दृश्य जरा बघा… शेतात आणि रस्त्यावर दिसणाऱ्या ह्या बकऱ्यांचा हा ‘रैम्प वॉक’ बघा… सजून-नटून-थटून, आलेले हे ‘मॉडेल्स बकऱ्या’… अकोट येथील जे.सी.आय.’ अर्थातच ‘जुनिअर चेम्बर्स इंटरनेशनल; ही संस्था प्रसिद्ध आहेय ती त्यांच्या दरवर्षीच्या आगळ्या-वेगळ्या अन ‘हटके’ ‘फैशन शो’ साठी. याआधी या संस्थेने अकोट येथे गाय, म्हैस, बैल, कुत्रा, ऑटो, बैल-गाडी, ट्रॅक्टर अशा कृषी संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या घटकांचे ‘फैशन शो’ आयोजित केलेत…. आजचा ‘ बकऱ्यांचा फॅशन शो’ त्यांच्या याच वेगळेपणाची जाणीव करून देणारा आहे….. पारम्पारिक शेतीसोबतच शेतकरी जोडधंदा म्हणून बकऱ्यांच पालन करतात, या बकऱ्यांच दूध औषधी गुणधर्माच सुद्धा आहे. शेतकरी वर्षभर आपल शेत-शिवार फुलविण्यासाठी राब-राब राबत असतोय. मात्र एखादावेळी शेतीत नुकसान झालं तर हीच बकरी त्याच्या उपयोगी ठरते, बकरी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सुबत्ता प्राप्त करून देणारी असते. म्हणूनच आजचा हा आगळा-वेगळा फैशन शो म्हणजे बकऱ्यांच्या समर्पणाला केलेला सलाम असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news