झोपडीत घुसला भरधाव ट्रक; चार मजुरांचा जागीच मृत्यू, सहा जखमी

खामगाव नादुरा-राष्ट्रीय महामार्गावर काम करून सत्याच्या बाजूला झोपडी करून झोपलेल्या मजुरांना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना आज पहाटे वडनेर भोलजी हडली. 4 मजुरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एक खबळ उडाली आहे.राष्ट्रीय महामार्ग क्र.६ उड्डाण पुल जवळ रोडचे काम सुरु आहे. या ठिकाणी काम करणारे मजुर रोडच्या बाजुला झोपडी करून राहतात. दरम्यान काल दिवसभर काम हे मजूर आपल्या झोपडीत झोपले होते. मात्र आज पहाटे पाच वाजेदरम्यान काळ बनून आलेल्या ट्रक क्र.पीवीसी ४०७४ ने मजुराची झोपडी उडवून देत त्यात झोपलेल्या मजुराना चिरडले. या भीषण अपघातात प्रकाश मांडेकर (२६), पंकज तुळशिराम जांबेकर (१९) अभिषेक रमेश जायकर(१८) सर्व रा. मोरगड ता. चिखलदरा जि. अमरावती हे जागीच ठार झाले तर राजा बुडा जावकर (३०) रा. गुणरामभोगमा ३५ रावल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या भीषण अपघातात कुमार सी. कुमार राम (१८), सतपालकुमार मानसिंग राम (२२), मेहसराम रवी (६५), आशीष कुमार राम (१८) सर्व रा. मतली ता.जि.पला झारखंड दिपक (२३) रा. मोरगड हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेने सर्व व्यक्त होत आहे. या प्रकरणी फरार झालेल्या ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news