कृषीच्या विद्यार्थिनिनी केले बोर्डो पेस्टबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कृषीच्या विद्यार्थिनिनी केले बोर्डो पेस्टबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी महाविद्याल, रिसोड येथील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कवठा येथील कृषिकन्या निकिता देशमुख,स्नेहल बोडखे,विशाखा चव्हाण,साक्षी देशमुख, तेजस्विनी रेड्डी, श्रावणी बाशमोनी, यांनी बुरशी व खोड रोग नियंत्रण संबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. बुरशी रोग व खोड रोगांवरील प्रभावी नियंत्रणासाठी बोर्डो पेस्ट व मिश्रण वापरली जाते. कळीचा चुना दगडरहित असावा, मिश्रण करताना धातूच्या भांड्याचा वापर करू नये, फवारणी होईपर्यंत प्लॅस्टिक ड्रममध्ये मिश्रण करावे, क्षारयुक्त पाणी वापरू नये, जर बोर्डो पेस्ट केलेली असेल तर ती जमिनीपासून १.५- २ फूट खोडाला वर लावावी, मिश्रण ढवळताना लाकडी किंवा प्लॅस्टिक काठीचाच वापर करावा याबद्दलची सर्व माहिती उपस्थित असणाऱ्या शेतकरी युवराज सरनाईक आणि भिकाजी सावसुंदर व इतर समस्त ग्रामस्थांना कृषीकन्यानी माहिती दिली. सदर प्रात्यक्षिक करिता कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. अप्तुरकर, तांत्रिक समन्वयक आर. एस. डवरे व विषय विशेषतज्ञ प्रा. वि. एस. बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली व रावे कार्यक्रम समन्वयक प्रा. डी. डी.मसुडकर, कार्यक्रम अधिकारी व प्रा. आर. वाय. सरनाईक आणि मॉनिटर प्रा . जी. आर. गोहड़े मार्गदर्शन लाभाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news