रूपनाथ विद्यालयात दहिहांडा रक्तगट तपासणी शिबिर संपन्न

रूपनाथ विद्यालयात दहिहांडा रक्तगट तपासणी शिबिर संपन्न

प्रतिनिधी:दिपक भांडे

शासनाच्या नवीन अध्यादेशानुसार शाळेत अध्यापन करत असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा रक्तगट माहीत असावा या उद्देशाने वर्ग एक ते बाराच्या सर्व विद्यार्थ्यांना वजन, उंची व त्याचा रक्तगट तपासणी करून शाळेत नोंद ठेवावी या हेतूने सर्वांना तो अनिवार्य करण्यात आला आहे. सर्व विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी करून शाळेत त्याची नोंद घ्यावी याकरिता पालक व विद्यार्थी यांचा होणारा खर्च व नाहक त्रास या दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी रूपनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय दहीहंडा येथे रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात वर्ग पाच ते बाराच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपला रक्तगट तपासणी करून घेतली. रक्तगट तपासणीनंतर त्याच दिवशी विद्यार्थ्यांना त्यांच्या रक्तगटाचा पुरावा म्हणून रक्तगट कार्डसुद्धा वितरित करण्यात आले. जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी आपले रक्तगट तपासणी करून रक्तगटाची माहिती घेतली. या शिबिरामुळे अतिशय अल्प दरात विद्यार्थ्यांना त्यांचे रक्तगट तपासणी करण्याची संधी प्राप्त झाली. या शिबिराच्या संपन्नतेसाठी व यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य श्री अघडते सर आणि डॉ नासीर खान तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.
तसेच सर्व विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी मानले शिक्षकांचे आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news