सेल्फी विथ मेरी माटी मेरा देश अभियान,मातृ शक्तींचा सन्मान जागर

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा
अकोला ग्रामीण सेल्फी विथ मेरी माटी मेरा देश अभियान,मातृ शक्तींचा सन्मान जागर

निखिल इंगळे सह किरण निमकंडे – अकोला जिल्हा राष्ट्र निर्माण सोबत धर्म संस्कृतीचे जतन करण्याचं काम व परंपरा कायम ठेवण्याचे मातृशक्ती करत असते त्यासाठी दिल्ली येथे शहीद स्मारक इथे आनंद अमृत उद्यानासाठी देशभरातील मातृ शक्तींच्या योगदानाने मेरा देश मेरा माती या अभियानांतर्गत प्रत्येक क्षेत्रातील माती जमा करून तसेच महाआरती विविध धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मातृशक्तींचा सन्मान भारतीय जनता पार्टी महिला आघाडीने करून समाजाला दिशा दिल्याचे प्रतिपादन सौ.सुहासनीताई धोत्रे यांनी केले. भाजपा महिला आघाडी अकोला ग्रामीण तर्फे विविध महिला मंडळ तसेच देवी मंडळ शारदा मंडळ यांना भेटी देऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा तसेच गरबा एकत्रीकरण धर्म संस्कृती संवर्धनाचा काम करणाऱ्या मंडळाचा गौरव करण्याचे काम व प्रत्येकाचा देशाचा विकासामध्ये योगदान असावा या दृष्टीने अभियान राबविण्यात येत आहे या अंतर्गत भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्षा सौ. वैशाली निकम यांनी आज पातूर येथे विविध मंडळात भेटी दिल्या त्यावेळी प्रसंगी त्या बोलत होत्या.
सौ.सुहासिनीताई धोत्रे,सौ.गंगादेविजी शर्मा,सौ.मंजुषा ताई सावरकर,सौ.पुष्पाभाभी खंडेलवाल, सौ.सीमाताई मांगटे पाटील, जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात अकोला ग्रामीण पातूर येथे सेल्फी विथ मेरी माटी मेरा देश हा कार्यक्रम शीला आवटे शहराध्यक्ष यांचे निवासस्थान जवळ छ. शिवाजीनगर,खडकेश्वर देवी संस्थान येथे करण्यात आला होता.
यावेळी सौ.वैशाली निकम, भारतीताई गाडगे,सौ.तुळसाबाई गाडगे, सौ.वर्षाताई बगाडे,सौ. माधुरी ढोणे,सौ.शीलाआवटे,सौ. प्रिया कोथळकर,सौ.मंजुषा लोथे, सौ.कल्पना खराटे सौ.वैशाली पेंढारकर,सौ.कल्पना म्हैसने व महिला आघाडी सर्व पदाधिकारी कार्यकर्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत शारदीय नवरात्रौत्सव निमित्त मंडळात शारदा मातेची आरती करण्यात आली.तसेच 55 जणांना मातीचे महत्व सांगून त्यांच्या हातातील मातीसहित सेल्फी विथ मेरी माटी मेरा देश या अभियानाचा अकोला ग्रामीण, पातूर येथे प्रारंभ करण्यात आला.
सर्व नगरसेविका,पदाधिकारी, तसेच परिसरातील महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

निखिल इंगळे सह किरण निमकंडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news