पातूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना दिवाळी भेट

पातूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना दिवाळी भेट

आमदार नितिन देशमुखांच्या पुढाकारातून धान्य कीट

पातूर तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना देखील दिवाळीत सामाजिक दायित्व म्हणून त्यांच्याही पदरी दिवाळीचा आनंदाचे काही दान पडावे या हेतून बाळापूर विधानसभा सदस्य आमदार नितीन देशमुख यांच्या पुढाकारात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला पातूर तालुक्यात विविध गावा मध्ये धान्य कीट व साडीचोळीचे वितरण करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
बाळापूर विधानसभा मतदार संघातील पातूर तालुका तथा वाडेगाव व देगाव जिल्हा परिषद सर्कलमधील 300 आत्महत्या केलेल्या कुटुंबातील कर्ता पुरुषाचा मृत्यू झाल्यामुळे अश्या कुटुंबाला मायेचा आधार देत आलेगाव व कार्ला येथील निलेश राजनकर, संतोष इंगळे, विनोद महल्ले, राजु पद्मने, राहु कोल्हे, निलेश वानखडे, दत्ता इंगळे, साबिर टेलर, सुबेदार खॉ रहिम खॉ, बाळु बोदडे, विक्की घायवट, सुभाष बोदडे आदी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील बहिणींना भाऊबीजनिमित्त सरबती गहू 25 किलो, फटका तूर डाळ 5 किलो, चनाडाळ 5 किलो, बासमती तांदूळ 2, खांडसरी साखर 5, तेल 1 किलो व साडीचोळीचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना पातूर तालुकाप्रमुख रवींद्र मुर्तडकर, किशोर राउत,गणेश ढोणे, संजय महल्ले, उमेश राऊत, प्रविण धाईत, कैलास राऊत, पुरुषोत्तम मावलकर, सुनिल खराटे, ऐजाज खान, मोहम्मद इम्रान मोहम्मद सईद उपस्थित होते. किशोर राऊत यांनी संचालन केले.
—————————
चोंढीकर कुटुंबियांनाही दिला मदतीचा हात

आलेगाव येथील संजयअप्पा चोंढीकर हे गुरेढोरे चारत असत. काही दिवसांपूर्वी अचानक गुरांना नियमितपणे चरायला घेऊन गेले असता त्यांना भोवळ येऊन ते खाली पडले. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी नागपूर येथे नेण्यात आले होते. दरम्यान 8 नोव्हेंबरला उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले होते. त्यांच्याही कुटुंबियांना दिवाळीत मदतीचा हात म्हणून आ. नितीन देशमुख यांनी 11 हजारांची रोख मदत दिली. तर कृष्णा अंधारे यांनीही दहा हजारांची रोख मदत केली आहे.

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news