सचिन ढोणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तगट तपासणी शिबिर

सचिन ढोणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तगट तपासणी शिबिर

जवळपास 800 लाभार्थ्यांनी घेतला लाभ

पातूर : येथील सामाजिक, राजकीय, सहकार, कृषी या सारख्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवणारे भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते सचिन समाधान ढोणे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 28 नोव्हेंबर रोजी समाधान फाउंडेशन पातुर तथा सावित्रीबाई फुले परिवार पातुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन सावित्रीबाई फुले विद्यालय पातुर येथे करण्यात आले होते.
शालेय विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कामासाठी व आपल्या वैयक्तिक आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी रक्तगट माहीत असणे आवश्यक असते धकाधकीच्या जीवनात कोणावर कोणता प्रसंग ओढावेल सांगता येत नाही त्यासाठी त्वरित वैद्यकीय सेवा पुरवणे सोयीचे व्हावे या उद्देशाने रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचा लाभ जवळपास 800 लाभार्थ्यांनी घेतला.
आजकाल वाढदिवसानिमित्त फटाक्यांची आतिशबाजी करने,पार्ट्या करणे व पैशाची उधळण करणे ही आपली संस्कृती होऊन बसली आहे परंतु सामाजिक आरोग्याकडे कोणाचेच लक्ष नाही समाजाचे आरोग्य सांभाळणे ही आपली जबाबदारी आहे परंतु जबाबदारीकडे सगळेच दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते परंतु या सगळ्या गोष्टींना फाटा देत सचिन ढोणे यांनी आपला वाढदिवस नेहमीप्रमाणे एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे व सर्वांनी समाजहिताच्या दृष्टीने व सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने असे कार्यक्रम आयोजित करावे असे आवाहन केले आहे या शिबिराला यशस्वी करण्यासाठी श्री. कम्प्युटराइज क्लीनिकल लेबोरेटरी पातुर तसेच समाधान फाउंडेशन पातुरचे कार्यकर्ते व सावित्रीबाई फुले परिवारातील सदस्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news