जवाहर नगर ते शासकीय दूध डेरी रस्त्यावर फोर व्हीलर वाहन नालीत कोसळले!

जवाहर नगर ते शासकीय दूध डेरी रस्त्यावर फोर व्हीलर वाहन नालीत कोसळले!
सुदेवाने जीवितहानी नाही! न्यायालयाने आदेश दिल्यावरही अतिक्रमणाची होत आहे पायमल्ली!

अकोला शहरातील जवाहर नगर ते शासकीय दूध डेरी रस्त्यावरील नालीचे बांधकाम करण्यात येत आहे. या अगोदर या रस्त्यावर मोठा नाला होता. आता नाला तोडून त्या ठिकाणी नालीचे बांधकाम करण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या नालीचे बांधकाम करण्यात येत असून संबंधित ठेकेदाराने. रस्त्यावरील धापे तोडल्यामुळे काल सायंकाळी मोठा अपघात होता होता राहिला. हा रस्ता वर्दळीचा असल्यामुळे या संदर्भात न्यायालयाने या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे तातडीचे आदेश मनपा प्रशासनात दिले होते मात्र अद्यापही न्यायालयाच्या आदेशावर कारवाई झाली नाही म्हणूनच रदारीच्या संदर्भात अतिक्रमणामुळे या रस्त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे म्हणूनच अशा घटनांत वाढ होत आहे.

काल या रस्त्यावरून जाणारे एक फोर व्हीलर वाहन थेट नाली मध्ये जाऊन पडले मात्र सुदेवाने जीवित हानी झाली नाही व अपघातात कोणीही जखमी झाले नाही. संबंधित ठेकेदाराने कुठलेही निदर्शक फलक या रस्त्यावर न लावल्यामुळे हा अपघात झाल्याचे स्थानिक नागरिका कडून बोलले जात आहे. तसेच हा रस्ता अतिशय अरुंद झाला असून हा रस्ता नॅशनल हायवे क्रमांक सहाला जोडला जातो. जवाहर नगर ते शासकीय दूध डेरी वरील अतिक्रमण काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्यावर ही महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. सदर रस्त्यावरील अतिक्रमण न काढल्यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे येथे अपघाताची मालिका नेहमीच सुरू असते. तसेच दुसरीकडे लवकरच भूमिगत गटार योजनेचे काम सुरू होणार असून मग नालीचे बांधकाम कशाला असाही सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे. संबंधित यंसंदर्भात लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news