बॅग लिफ्टींग प्रकरणी आरोपी स्थानीक गुन्हे शाखा शाखेच्या जाळ्यात!

बॅग लिफ्टींग प्रकरणी आरोपी स्थानीक गुन्हे शाखा शाखेच्या जाळ्यात!

आरोपी कडून ७९,००,०००/-रू हस्तगत!

दिनांक २६ नोव्हेंबर रोजी फिर्यादी राजु चेलाजी प्रजापती वय २६ वर्ष रा. आंगडीया सर्विसेस गजानन टॉवर शंकर नगर रोड राजापेठ अमरावती हे त्यांचे व्यापाराचे पैसे घेवून ट्रॅव्हल्स ने अमरावती येथून मुंबई येथे जात असता पोलीस स्टेशन पातुर ह‌द्दीतील क्वालीटी धाब्यावर बस थांबल्यानंतर फिर्यादी हे गाडीचे बाहेर आले असता तेवढ्‌यातच आरोपीतांनी सदर ट्रॅव्हल्स मध्ये प्रवेश करून फिर्यादीची पैश्यांने भरलेले बॅग चोरून फरार झाले होते. वरून पोलीस स्टेशन पातुर येथे अपराध नं ५३२/२३ कलम ३७९ भा.दं.वि नोंद असून तपासावर आहे. सदर चोरीची उकल करण्यासाठी पोलीस अधीक्षक अकोला यांनी स्थागुशा अकोला यांना आदेशीत केले होते. पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा यांनी त्यांचे अधिनस्त एक पथक तयार करून सदर गुन्हा उघडकीस आणणे करीता रवाना करण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या आदेशावरून तसेच मार्गदर्श नाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास डी. भगत, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव पोलीस अमंलदार यांनी सदर गुन्हयाचा छडा लावण्यासाठी गोपनिय बातमीदार तसेच तांत्रिक बाबीच्या आधारे सदर गुन्हा करण्याऱ्या आरोपी निष्पन्ण केले. स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथक हे मध्यप्रदेश येथे रवाना होवून त्यांनी ग्राम खेरवा ता मनवार जि. धार येथील आरोपी नामे विनोद विश्राम चव्हाण वय १९ वर्ष रा. लुन्हेरा बुजूर्ग ता. मनावर जि. धार याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेवून गुन्हया सबंधाने विचापूस केली असता, त्याचे राहते घरातुन रोख रक्कम रुपये ७९,००,०००/-रू (ऐकोणअंशी लाख रूपये) दोन पंचा समक्ष जप्त करण्यात आले. त्यावरून त्यास त्याचे साथीदार रहेनान उर्फ पवली गफुर खाण याला पोलीसांची चाहुल लागल्याने तो फरार झाला. त्याचा शोध घेतला असता तो मिळूण आला नाही.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अकोला
संदीप घुगे साहेब, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे स्थानिक स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक .शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अकोला पोलीस उपनिरीक्षक कैलास डी. भगत, पोलीस उपनिरीक्षक, गोपाल जाधव, पोलीस. अंमलदार, गणेश पांडे, राजपालसिंग ठाकुर, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, अब्दुल माजीद, विशाल मोरे, एजाज अहेमद, वसीमोद्दीन शेख, अविनाश पाचपोर, भिमराव दिपके, स्वप्नील चौधरी, राहुल गायकवाड, अन्सार शेख, मोहम्मंद आमीर, लिलाधर खंडारे, खुशाल नेमाडे, चालक अक्षय बोबडे, प्रविण कश्यप, प्रशांत कमलाकर, अनिल राठोड यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news