पोटच्या गोळ्या सह मातेने आपले जीवन संपवले काटेपूर्णा नदीपात्रातील घटना

पोटच्या गोळ्या सह मातेने आपले जीवन संपवले काटेपूर्णा नदीपात्रातील घटना

कुरणखेड – योगेश विजयकर
बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील काटेपूर्णा नदीच्या पत्रात एका तेहतीस वर्षे महिलेने आपल्या साथ वर्षाच्या मुलासह नदी पात्रात उढि घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या कुरणखेड येथील काटेपूर्णा नदीच्या पात्रात एका तेहतीस वर्षीय महिलेने आपल्या सात वर्षीय मुलासह आत्महत्या केल्याचे समजले कुरणखेड येथील श्री चंडिका देवी संस्थांच्या पायथ्याशी असलेल्या नदीपात्रामध्ये एक महिला आणि लहान मुलगा सकाळी फिरत दिसले होते फिरत दिसत असताना त्या महिलेची बॅग नदीकाठी ठेवलेली दिसली ती बॅग ठेवली दिसली असता शेतकऱ्यांनी कुरणखेड येथील माँ चंडिका आपत्कालीन बचाव पथक यांना पाच रन केले पथकाने घटनेचा सुगावा लावला असता घटनास्थळावरून एक किलोमीटर नदी पात्रात पाहणी केली असता तेहतीस वर्षे महिला व सात वर्षीय मुलाचा मृतदेह शोधून आला बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या माध्यमातून व त्यांच्या उपस्थितीत दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले मृतदेहाची ओळख मृत देहाच्या गळ्यामध्ये ओळखपत्र मिळाले आहे त्यामध्ये अश्विनी महालकर( आष्टांकर ) राहणार वर्धा वय 33 वर्ष मुलगा शिवांश आष्टकर वय सात वर्ष राहणार वर्धा असे ओळखपत्र मिळून आले आहे यावेळी घटनास्थळी माँ चंडिका आपत्कालीन पथक यांच्या माध्यमातून मृतदेह नदी पात्रातून काढण्यात आला बोरगाव मंजू पोलीस यांच्या सहकार्यातून मृतदेहाला उर्वरित तपासणीसाठी अकोला जिल्हा सर्वोच्च रुग्णालयात दाखल करण्यात आले वृत्तलेस्त आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही घटनास्थळी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे सहाय्यक ठाणेदार ठाकरे पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे बीड जमादार सतीश सपकाळ, पवार, विर,सुदिप राऊत, घटनास्थळी दाखल झाले होते

माँ चंडिका आपत्कालीन बचाव पथक यांच्या सुगाव्याने लागला मृतदेहाचा शोध
परिसरात कुठली घटना झाली तर कुरणखेड येथील माँ चंडिका आपत्कालीन बचाव पथक हे घटनास्थळी दाखल होते कुठली घटना घडली असता नागरिक पथकाशी संपर्क साधतात आज या घटने संदर्भात सुद्धा शेतकऱ्यांनी पथकाला पाचरण केले असता पथकाच्या सुगावणे या महिलेचा मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढण्यात आला यामध्ये पथकाचे प्रमुख रंजीत घोगरे, संपर्क प्रमुख योगेश विजयकर,विरेंद्र देशमुख, विजय माल्टे, शाहबाज शाहा, शेख नजिर, मंगेश पावडे, ईश्वर हरणे, स्वप्निल चिम, अजय माल्टे, सय्यद माजीद , मोहन वाघमारे, योगेश बोधळे, रवी घोगरे, राम उमाळे, संतोष गोगटे, शुभम कातखेडे, यांनी मृतदेह बाहेर काढला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news