अडाण धरणात बुडालेल्या महीलेला पिंजर येथील आपात्कालीन पथकाने शोध घेऊन काढले बाहेर..

अडाण धरणात बुडालेल्या महीलेला पिंजर येथील आपात्कालीन पथकाने शोध घेऊन काढले बाहेर..

 पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी अडाण धरणारणाच्या तळाशी असलेला मृतदेह 15 मिनटात शोध घेऊन बाहेर आणला. मानोरा ते कारंजा तालुक्यातील सीमारेषेवर असलेल्या अडाण धरणात 22 डिसेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार वैष्णवी गजानन भैसे रा.चांदुर रेल्वे येथील महीला बुडाली होती काल पासून स्थानिक पातळीवर शोध घेतला असता काही मिळुन आले नाही शेवटी आज कारंजा ग्रामीण चे ठाणेदार विजय महल्ले साहेब यांनी तसेच वाशिम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांनी देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करिता पाचारण केले होते.आज सकाळी जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी आपले सहकारी अतुल उमाळे, गोपाल गीरे,मयुर सळेदार, उल्हास आटेकर,अंकुश सदाफळे,विष्णू केवट,शेखर केवट,ऋषिकेश तायडे, यांना शोध व बचाव साहीत्यासह घटनास्थळी रवाना केले घटनास्थळी पोहचताच लगेच सिन ट्रेस केला आणी अंडर ड्राईव्ह सर्च ऑपरेशन चालु केले आणी अवघ्या 15 मिनटात तळाशी असलेला मृतदेह शोधून बाहेर काढला यावेळी यावेळी कारंजा ग्रामीण चे पि.आय. सुनिल वानखडे,पि.एस.आय गजानन कदम,ए.एस.आय. विजय महल्ले,हे.काॅ.रविंद्र नागरे,हे.काॅ.विनोद महाकाळ, पो.काॅ.कपिल सुडके,पो.काॅ. रविंद्र व-हाडे तसेच इंझोरी येथील सास चे अजय ढोक, हितेश ढोरे,समीर शहा, विशाल वानखडे,आणी नातेवाईक घटनास्थळी हजर होते आणी विषेशतः कारंजा तहसीलदार कुणाल झाल्टे सर मानोरा तहसीलदार रवी राठोड सर जातीने लक्ष ठेवून होते.अशी माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news