मराठा सर्वे साठी कुली,चपराशी,सुरक्षा रक्षक ची नियुक्ती!

मराठा सर्वे साठी कुली,चपराशी,सुरक्षा रक्षक ची नियुक्ती!
अकोल्यातही सर्वेक्षणात तांत्रिक अडचणी!
मराठा सर्वेक्षण करतांना चुक झाल्यास जवाबदार कोण!

अकोला:- महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत असलेल्या महानगरपालिकेच्या कर्मच्यार्याना जुपले मराठा सर्वेक्षण साठी मनपाने यात कुली चपराशी व सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केल्याने मराठा सर्वेक्षण करतांना चुक झाल्यास कोण जवाबदार राहणार यामुळे मराठा समाजाचे सर्वेक्षण बाबत जांगळगुत्ता झाला असल्याचे चित्र महानगरपालिकेत दिसत आहे. अकोल्यातही सर्वेक्षणात तांत्रिक अडचणी तर दुसरीकडे नियुक्त शिक्षकांची सर्वेक्षणाला दांडी मारताना दिसून येत आहे. तर यामध्ये यामध्ये ब-र्याच कर्मचाऱ्यांना अन्ड्राईड मोबाईल हाताळता येत नसल्यामुळे त्यांना रोजंदारीवर इतर मुले घेऊन सर्वेक्षण करण्याचा सल्ला दिल्या जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे मुलांचे कॉलेज तसेच ट्युशन कडे दुर्लक्ष होत आहे. मराठा सर्वेक्षण चा मुद्दा निकाली निघणार आहे की नाही यावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. या सर्वेक्षण करिता योग्य मार्गदर्शन आणी शिक्षणाचा अभाव नसल्यामुळे मनपावर मात्र नामुष्कीची पाळी येणार असल्याची चर्चा सुरु आहे. या सर्वेतुन महिलांना वगळले आहे यामध्ये साप्रवि ने आपले खिसे गरम केल्याने इतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. यावर आयुक्त तथा प्रशासक काय निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news