भगवंताच्या कृपेसाठी शुद्ध भावाची आवश्यकता-पु गोपाल महाराजांचा छत्रपती संभाजी महाराज उद्यानात भागवत सप्ताह

भगवंताच्या कृपेसाठी शुद्ध भावाची आवश्यकता-पु गोपाल महाराजांचा छत्रपती संभाजी महाराज उद्यानात भागवत सप्ताह

भागवत सप्ताहास उत्स्फूर्त प्रतिसाद

अकोला- जगात प्रत्येकाला प्रभू प्राप्तीची गरज आहे.ही गरज पूर्ण करतांना प्रभाकृपेची आवश्यकता आहे.म्हणून या कृपेसाठी सर्वप्रथम मनाची शुद्धता अत्यावश्यक असल्याचा हितोपदेश भागवताचार्य पु गोपाल महाराज कारखेडकर यांनी केला.गुरुवर्य वासुदेव महाराज
यांच्या स्मरणार्थ व वैखुंटवासी.बाबुराव पवित्रकार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आशीष पवित्रकार मित्र परिवारच्या वतीने स्थानीय जवाहर नगर परिसरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात सुरू असलेल्या पु.गोपाल महाराज यांच्या भागवत कथेत त्यांनी आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 8 वाजता तृतीय पुष्प गुंफले.ते म्हणाले, अलीकडे समाजात उपासना व त्याची पद्धत बदलण्याची दिनचर्या सातत्याने सुरू आहे. अगदी विविध भगवंतांना आलटून पालटून बदलल्या जाते. मात्र अशी वारंवार पूजा विधी,मंगलमय उपासना बदलली तर इष्टदेव प्रसन्न होत नाहीत. सर्वांची पूजा करा,मात्र ध्यान एकाचेच करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

ते म्हणाले,भगवंतांना दोन्ही हाताने नमस्कार करा, वंदन करा.या पद्धतीमुळे आपले प्रारब्ध बदलत असते. पूजा विधि संदर्भात त्यांनी प्रथम भगवंताला आपल्या डोळ्यात स्थिर करण्याचे सांगितले.अशा स्थिरतेमुळे मन पण स्थिर होऊन हे मन भगवंताच्या प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मनाच्या स्थिरतेमुळे कलुषित भावना व विकृती अंतर्मनात शिरत नाहीत. ते म्हणाले,बुद्धीला निवृत्त करण्यासाठी भगवंताचे चिंतन महत्वाचे आहे. जो मनाच्या मागे गेला तो संपला. व जो संताच्या मागे गेला तो तरला! म्हणून संतांना शरण जाण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. ज्याप्रमाणे जीवनात भोजन महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे जीवनात भजन व भक्ती पण महत्त्वाची आहे. गोपाल महाराजांनी या सत्रात बद्रीविशाल ची माहिती सांगितली. ते म्हणाले,अपेक्षा दुखाला कारण होतात व तितीक्षा सुखाला कारणभूत होतात. मंदिरात नाही गेले तरी चालेल, पण चांगले कर्म करून जीवन व्यर्थ गमावू नका. सत्संगाची कास धरा. जास्तीत जास्त वेळ एकांतात घाला. एकांतात मन स्थिर होऊन प्रभू प्राप्तीच्या मार्ग सुकर होत असल्याचे त्यांनी सांगितले.प्रारंभी माजी आ गजानन दाळू गुरुजी,माजी आ. बबनराव चौधरी ,ऋषिकेश पोहरे आदींनी
पु गोपाल महाराज यांचे स्वागत केले तर आरतीत अनेकांनी
सहभाग घेतला. संचालन राजेश राख यांनी केले.दि 8 फेब्रुवारी रोजी सायं.5-30 वाजता हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या काल्याच्या कीर्तनाने या भागवत सप्ताहाची पूर्णाहुती होणार आहे.नित्य साय 7 वाजता सुरू होणाऱ्या या भागवत कथेचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन श्रीमद् भागवत सेवा समिती व आशिष पवित्रकार मित्र परिवारच्या वतीने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news