“अकोट शहर पोलीसांची तसेच स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही देशी कट्टयांसह ०९ जिवंत राउंड जप्त”

“अकोट शहर पोलीसांची तसेच स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही देशी कट्टयांसह ०९ जिवंत राउंड जप्त”

दिनांक १६. जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक राजेश डी. जवरे हे डिबी पथकासह पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमी च्या आधारे , दोन इसम हे अकोट ते अकोला रोडवर अकोला नाक्याचे पुलाखाली केशरी रंगाची पल्सर मोटरसायकल घेवुन उभे असुन त्यांचेजवळ देशी कट्ट्टा अग्निशस्त्र असल्याची माहिती मिळताच सदर व्यक्ती जवळ जावुन त्यांची विचारपूस करून अंगझडती घेतली असता त्यांचेजवळ एक खाली मॅक्झीन मिळुन आल्याने त्यांना विचारपुस करून त्यांनीते विहीरीत टाकलेले दोन देशी कट्टे व ०९ जिवंत राउंड विर एकलव्य आपतकालीन पथकाचे मदतीने पंचांसमक्ष विहीरीतुन काढुन यातील आरोपी अजय तुलाराम देठे वय २७ वर्ष राहणार. धोबीपुरा अकोट प्रफुल्ल विनायक चव्हाण वय २५ वर्ष राहणार. अडगांव बु तालुका तेल्हारा जिल्हा, अकोला यांना मोटरसायकलसह ताब्यात घेतले. त्यांचेविरुदध अप.क. ३१/२४ कलम ३,२५ विविध प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला. यातील दोन्ही आरोपी यांना दि. १७/०१/२०२४ रोजी अटक करून सदर आरोपींना न्यायालयकडुन २ दिवसांचा पोलीस कोठडी मीळाला. त्यांचे कडुन गुन्हयाचे तपासात मास्टरमाइंड असलेला तीसरा आरोपी नामे शुभम रामेश्वर लोणकर वय २५ वर्ष, राहणार नेवरी तालुका. अकोट, जिल्हा. अकोला हल्ली मुक्काम. भालेकर वरती, वारजे, पुणे निष्पन्न करून त्याचा उजैन मध्यप्रदेश येथे जावुन शोध घेतला असता तो तेथुन पसार झाला. त्यानंतर त्यास भालेकर वस्ती, वारजे, पुणे येथुन ताब्यात घेवुन दि.३० जानेवारी रोजी अटक करून त्यास मा. न्यायालय अकोट यांचेकडे हजर केले असता त्याचा ३ दिवस पोलीस कोठडी मीळाली . तपासा दरम्यान आरोपी शुभम लोणकर याचे मोबाईल वरून गॅगस्टर लॉरेन्स बिश्नोई सारख्या दिसणा-या व्यक्तीसोबत व्हिडीओ कॉल, त्याचा भाउ अनमोल बिश्नोई याचे सोबत ऑडीओ कॉल तसेच इंटरनॅशनल नंबरवरून कॉल केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. गुन्हयाचा पुढील सर्वतोपरी तपास सुरू असुन पुढील तपास पोलीस स्टेशन अकोट शहर व स्थानिक गुन्हे शाखा अकोला करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अकोला श्री. बच्चन सिंग, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, अनमोल मित्तल, सहाय्यक . पोलीस अधीक्षक, . शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला, पोलीस निरीक्षक शतपन कोल्हे, पोलीस स्टेशन अकोट शहर यांचे मार्गदर्शनाखाली
साहेब पोलीस निरीक्षक. कैलास भगत, पोलीस उपनिरीक्षक राजेश नवरे, पोलीस उपनिरीक्षक. अख्तर शेख, पोलीस उपनिरीक्षक, गोपाल जाधव , पोलीस कर्मचारी चंद्रप्रकाश सोळंके . पोलीस कॉन्स्टेबल विशाल हिवरे . पोलीस कॉन्स्टेबल मनिष कुलट . प्रेमानंद पचांग , रवि सदांशिव , सागर मोरे .कपील राठोड, अब्दुल माजीद, वसीमोददीन, व चालक पोलीस उपनिरीक्षक वासुदेव धर्म, चालक पोलीस कॉन्स्टेबल संदीप तायडे . यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news