उद्योगपती भरतीया चोरी प्रकरणातील आरोपी 48 तासात पोलिसांच्या ताब्यात!

उद्योगपती भरतीया चोरी प्रकरणातील आरोपी 48 तासात पोलिसांच्या ताब्यात!

गौरक्षण रोडवरील प्रसिध्द उदयोगपती यांचे बंगल्यातील घरफोडीच्या गुन्हयातील एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांचे कडुन ४८ तासात अटक दि.०४ मे रोजी पोलीस स्टेशन खदान येथील अप क ३८५/२४ कलम ४५७, ३८० भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपासावर आहे. सदर गुन्हयातील घरफोडी मध्ये सोने, चांदी तसेच रोख असा एकूण ४३,७७,३१७ रूपयाची चोरी झाली होती. सदर गुन्हयाच्या घटनास्थळी पोलिस अधिक्षक अकोला, अप्पर पोलिस अधिक्षक.अकोला, व उपविभागीय पालिस अधिकारी, शहर विभाग अकोला व पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला व स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस स्टाफ यांनी भेट दिली. यावेळी पोलिस अधिक्षक अकोला यांनी लेखी व तोंडी आदेश देवुन सदर गुन्हयात उघडकीस आणनेकामी आदेशीत करून सुचना दिल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सांगीतले. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे व स्थानिक गुन्हे शाखा येथील यांचे पथकातील पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळाचे आजुबाजुचा परीसराची पाहणी केली. परिस्थितीजन्य पुराव्यावरून गोपनिय माहितीचे आधारे अहमदनगर जिल्हयातुन इसम नामे जिगर कमलाकर पिंपळे तय ३७ वर्ष रा. पाखोरा, ता. गंगापुर, जि. संभाजी नगर यास ताब्यात घेतले. आतापर्यंत केलेल्या चौकशी दरम्यान त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्हयातील आरोपीतांनी चोरी केलेल्या मुददेमालाची आपसात हिस्से वाटे हे घटनेच्या दिवशी करून वेगवेगळया मार्गाने निघुन गेल्याचे अटक आरोपी याने सांगीतले.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक बच्चनसिंह अपर पोलीस अधिक्षक, अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला. पोलीस उपनिरीक्षक. आशिष शिंदे, ए.एस.आय. दशरथ बोरकर, पोलीस कॉन्स्टेबल फिरोज खान, अब्दुल माजीद, खुशाल नेमाडे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, वसीगोद्दीन, गोकुळ चव्हाण, भास्कर धोत्रे, सुलतान पठाण प्रमोद डोईफोडे, उमेश पराये, रविंद्र खंडारे, पो. कॉ अभिषेक पाठक, धिरज वानखडे, स्वप्नील खेडकर, स्वप्नील चौधरी, उदय शुक्ला, एजाज अहमद, लिलाधर खंडारे, अन्सार अहमद, गोहम्मद आमीर, राहूल गायकवाड सर्व स्थानिक गुन्हे शाखा अकोला तसेच सायबर सेलचे पोलीस शिपाई आशिष आमले, गोपाल ठोंबरे व चालक पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत कमलाकर चालक पोलीस कॉन्स्टेबल विजय कबले, प्रविण कश्यप यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news