कृषीपंपाचा शॉक लागून शिक्षकाचा मृत्यू

चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील चोंढी येथील घटना


पातूर : चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील चोंढी शेतशिवरात कृषीपंपाचा शॉक लागून शिक्षकाचा घटनास्थळावरच मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि.६ मे रोजी पहाटे घडली आहे. प्रल्हाद ठाकरे ५१ असे मृतक शिक्षकाचे नाव आहे. मृतक शिक्षक पातूर पंचायत समिती अंतर्गत शिर्ला येथे जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत होते,ते सोमवारी पहाटे भुईमूग पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. कृषीपंप सुरू करता वेळी शॉक लागून त्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news