अकोला महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी तसेच भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने काँग्रेस, उबाठासेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी सक्रिय झाली आहे.
आज उबाठासेनेच्या वतीने महापौर पदासाठी सुरेखा मंगेश काळे यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने उपमहापौर पदासाठी आझाद खान आलियार खान यांनी नामांकन अर्ज सादर केला आहे.
आता येत्या ३० जानेवारी रोजी महापौर आणि उपमहापौर कोण होणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

