अकोल्याच्या अकोट नगर परिषद निवडणूकीत नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवित असलेल्या महिला उमेदवाराचा अपघाती मृत्यू.. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक पदाचे महिला उमेदवार अलमास परविन शेख सलीम असं अपघातीत मरण पावलेल्या उमेदवाराचे नाव.. अकोट नगर पालिकेतील प्रभाग क्रमांक 4 चे राष्ट्रवादीचे नगरसेवक पदाचे ते अधिकृत उमेदवार होते. आज त्यांचा अमरावतीतील परतवाडा येथे अपघातात मृत्यू. अलमास परविन हे आज पती आणि मुलाबरोबर माहेरी जात असताना एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.. अपघाताची माहिती मिळताच अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात शोकाकूल वातावरण आहे.. दरम्यान, आज अकोट नगरपालिकेत निवडणुकी राष्ट्रवादीने आपली प्रचार सभा आणि प्रचार रॅली सर्व रद्द केले आहेत.. महिला उमेदवाराचा मृत्यू निश्चितच पक्षाला मोठी हानी देणारा असल्याच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हटले..