नांदुरा तेलंगानाहून जळगाव-खान्देशकडे निघालेल्या पद्मसिंह पाटील आणि पत्नी नम्रता पाटील या दांपत्याचा शोध अखेर भीषण स्वरूपात लागला. वडनेर भोलजी परिसरातील एका बंद पडलेल्या, निर्जन विहिरीत ही कार आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढली असता सर्वांची श्वासच रोखली कारच्या आतच पती-पत्नीचे निर्जीव, सडलेली स्थितीत मृतदेह आढळले!
हा साधा अपघात नाही, तर घातपाताची स्पष्ट शक्यता असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज. कारण विहीर बंद अवस्थेत, अंधारात आणि दुर्गम ठिकाणी असताना कार थेट आत कशी कोसळली? वाहनावरील ठसे, गाडीचा वेग, आसपासचे टायर मार्क्स—यांपैकी काहीच नेहमीच्या अपघाताशी जुळत नाही.
स्थानिकांमध्ये तीव्र संताप व भीतीचे वातावरण असून, हा दुहेरी मृत्यू की योजनाबद्ध घात? याबाबत अनेक तर्क-वितर्क रंगू लागले आहेत.दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास “संशयित मृत्यू” म्हणून सुरू केला असून गुन्हे शाखेची विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले
जळगाव जिल्ह्यातील पद्मसिंह दामू पाटील हे तेलंगणा राज्यातील सीतापुरम येथील एका खाजगी सिमेंट कंपनीमध्ये कार्यरत आहेत. ते व त्यांची पत्नी नम्रता हे त्यांच्या स्वतःच्या कार क्रमांक एम एच 13 बी एन 8583 ने जळगाव खान्देश जिल्ह्यातील पाचोरा येथे लग्न सोहळ्याला जाण्यासाठी निघाले होते. त्यांचं शेवटचं मोबाईल लोकेशन हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मलकापूर दरम्यान महामार्गावर असलेल्या वडनेर गावाजवळ आढळून आलं आहे. मात्र, त्यानंतर हे दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याची तक्रार दांपत्याच्या नातेवाईकांनी नांदुरा पोलिसात दाखल केली. त्यानुसार, पोलिसांचे पथक या दांपत्यांच्या शोधासाठी रवाना झाले असतानाच परिसरातील एका विहिरीत कार आढळून आली आहे. अचानक बेपत्ता झालेल्या दांपत्याच्या घटनेमागे घातपाताचा संशय ही व्यक्त होत आहे.
वडनेर भोलजी नजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 च्या बाजूला एका विहिरीत पांढर्या रंगाची एक कार आढळून आली असून ही कार पाटील दांपत्याची असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी नुकतेच पोलीस पोहोचले असून परिसरातील ग्रामस्थांनीही गर्दी केली आहे. सध्या विहिरीतून कार बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. परवा गुरुवार सायंकाळी पाटील दांपत्य तेलंगणाहून जळगावकडे जात असताना अचानक हे दाम्पत्य बेपत्ता झाले होते. त्यानंतर, पोलिसांनी गेल्या 24 तासापासून पोलिसांनी युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ती कार बाहेर काढली असता आतमध्ये दोघांचेही मृतदेह आढळल्याने सर्वांना धक्का बसला. हा अपघात आहे की घातपात? याची पुढील चौकशी आता पोलीस करत आहेत.

